Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › नवी नावे

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये नवी नावे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 16 उतारे, ओळीनुसार.

  • चांगले नाव मोठ्या संपत्तीपेक्षा अधिक इष्ट आहेनीति 22:1
    वचने
    नीति 22:1चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.

उदाहरणे

  • अब्रामाचा अब्राहाम झालाउत्प 17:5
    वचने
    उत्प 17:5येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे.
  • सारायची सारा झालीउत्प 17:15
    वचने
    उत्प 17:15देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल.
  • याकोबाचा इस्राएल झालाउत्प 32:28
    वचने
    उत्प 32:28तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.”
  • राहेलने आपल्या मुलाचे नाव बेनओनी ठेवले; त्याच्या वडिलांनी त्याला बन्यामीन म्हटलेउत्प 35:18
    वचने
    उत्प 35:18त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले.
  • फारोने योसेफाला सापनाथ-पानेह हे नाव दिलेउत्प 41:45
    वचने
    उत्प 41:45फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.
  • मोशेने नूनाचा मुलगा होशे याला यहोशवा हे नाव दिलेगण 13:16
    वचने
    गण 13:16मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)
  • नामी: मला नामी म्हणू नका, मला मारा म्हणारूथ 1:20
    वचने
    रूथ 1:20आणि ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु:खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे.
  • शलमोनाला यदीद्या हे नावही दिले2 शमु 12:24–25
    वचने
    2 शमु 12:24–25दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती. त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले.
  • फारो नखोने एल्याकीमाचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले2 राजे 23:34
    वचने
    2 राजे 23:34फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला.
  • बाबेलच्या राजाने मत्तन्याचे नाव बदलून सिद्कीया ठेवले2 राजे 24:17
    वचने
    2 राजे 24:17बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
  • दानीएल, हनन्या, मीशाएल, अजऱ्या: बेल्टशस्सर, शद्रख, मेशख, अबेदनगोदानि 1:7
    वचने
    दानि 1:7प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.
  • शिमोनाला केफा, म्हणजे पेत्र म्हटले गेलेयोहा 1:42
    वचने
    योहा 1:42त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
  • याकोब आणि योहान यांना बोआनेर्गेश, म्हणजे गर्जनेचे पुत्र, असे नाव दिलेमार्क 3:17
    वचने
    मार्क 3:17जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
  • कुप्र येथील योसेफाला बर्णबा, म्हणजे बोधाचा पुत्र, म्हटले गेलेप्रेषि 4:36
    वचने
    प्रेषि 4:36आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती.
  • शौल, ज्याला पौलही म्हणतप्रेषि 13:9
    वचने
    प्रेषि 13:9पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क