Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › बुधले, रांजण आणि कुप्या

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये बुधले, रांजण आणि कुप्या

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 31 उतारे, ओळीनुसार.

पाणी, द्राक्षारस आणि दूध यांसाठी बुधले

  • अब्राहामाने हागारेला भाकर आणि पाण्याचा बुधला दिलाउत्प 21:14
    वचने
    उत्प 21:14अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
  • बुधला रिकामा झाल्यावर तिला विहीर सापडली आणि तिने तो भरलाउत्प 21:15, उत्प 21:19
    वचने
    उत्प 21:15कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
    उत्प 21:19मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
  • याएलने सीसराला दुधाच्या बुधल्यातून प्यायला दिलेशास्ते 4:19
    वचने
    शास्ते 4:19तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे. मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्यास दूध प्यावयाला दिले व तिने त्यास पुन्हा झाकले.
  • गिबोन्यांनी फाटलेले आणि शिवलेले जुने द्राक्षारसाचे बुधले दाखवलेयहो 9:4, यहो 9:13
    वचने
    यहो 9:4तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली, आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले;
    यहो 9:13हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
  • हन्ना बैल, पीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेऊन शमुवेलाला शिलोला घेऊन आली1 शमु 1:24
    वचने
    1 शमु 1:24आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.
  • बेथेलला जाणारी तीन माणसे: करडे, तीन भाकरी आणि द्राक्षारसाचा बुधला1 शमु 10:3
    वचने
    1 शमु 10:3मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.
  • इशायाने दावीदाला भाकर, द्राक्षारसाचा बुधला आणि करडू देऊन शौलाकडे पाठवले1 शमु 16:20
    वचने
    1 शमु 16:20तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
  • अबीगईलेने दावीदासाठी द्राक्षारसाचे दोन बुधले आणि पुष्कळ अन्न आणले1 शमु 25:18
    वचने
    1 शमु 25:18अबीगईलेने घाई करून दोनशे भाकरी व द्राक्षरसाचे दोन बुधले व शिजवून तयार केलेली पाच मेंढरे व पाच मापे हुरडा व खिसमिसाचे शंभर घड व अंजिराच्या दोनशे ढेपा ही घेतली व गाढवावर लादली.
  • सीबा लादलेली गाढवे आणि द्राक्षारसाचा बुधला घेऊन दावीदाला भेटला2 शमु 16:1
    वचने
    2 शमु 16:1डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.
  • येशू: कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाहीमत्त 9:17, मार्क 2:22, लूक 5:37–38
    वचने
    मत्त 9:17तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत घालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”
    मार्क 2:22तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
    लूक 5:37–38आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.
  • अलीहू: माझे पोट नव्या बुधल्यासारखे फुटायला आले आहेईयो 32:19
    वचने
    ईयो 32:19पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे.
  • स्तोत्रकर्ता: धुराने सुकलेल्या बुधल्यासारखास्तोत्र 119:83
    वचने
    स्तोत्र 119:83कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
  • स्तोत्रकर्ता: “माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत”स्तोत्र 56:8
    वचने
    स्तोत्र 56:8तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?

रांजण आणि कुप्या

  • रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आलीउत्प 24:15
    वचने
    उत्प 24:15मग असे झाले की, त्याचे बोलणे संपले नाही तोच, पाहा, रिबका तिची मातीची घागर तिच्या खांद्यावर घेऊन बाहेर आली. रिबका ही अब्राहामाचा भाऊ नाहोर याच्यापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या होती.
  • गिदोनाच्या माणसांनी घागरींच्या आत मशाली नेल्या आणि घागरी फोडल्याशास्ते 7:16, शास्ते 7:19–20
    वचने
    शास्ते 7:16तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते.
    शास्ते 7:19–20तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली. असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडकी फोडली; “मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.”
  • शमुवेलाने शौलाच्या डोक्यावर तेलाची कुपी ओतली1 शमु 10:1
    वचने
    1 शमु 10:1तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
  • दावीदाने झोपलेल्या शौलाच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याची सुरई घेतली1 शमु 26:12
    वचने
    1 शमु 26:12तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
  • सारफथ येथील विधवेकडे मडक्यात मूठभर पीठ आणि थोडे तेल होते1 राजे 17:12
    वचने
    1 राजे 17:12तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.”
  • भांडी संपेपर्यंत एका विधवेने तेल ओतले2 राजे 4:2–6
    वचने
    2 राजे 4:2–6तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.” तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.” मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण तो तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
  • अलीशाने एका तरुण संदेष्ट्याला तेलाची कुपी देऊन रामोथ-गिलादला पाठवले2 राजे 9:1
    वचने
    2 राजे 9:1अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा.
  • यिर्मयाने कुंभाराचे मातीचे मडके विकत घेतले आणि वडिलांसमोर ते फोडलेयिर्म 19:1, यिर्म 19:10
    वचने
    यिर्म 19:1परमेश्वर असे म्हणतो, “जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.
    यिर्म 19:10मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.
  • काना येथे वीस ते तीस गॅलनचे दगडाचे सहा रांजण, काठोकाठ भरलेलेयोहा 2:6–7
    वचने
    योहा 2:6–7तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले.
  • पाण्याची घागर घेऊन जाणारा एक मनुष्य शिष्यांना वाट दाखवणार होतामार्क 14:13
    वचने
    मार्क 14:13येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा.
  • शोमरोनी स्त्री आपली घागर सोडून गावात गेलीयोहा 4:28
    वचने
    योहा 4:28ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली,
  • एका स्त्रीने जटामांसीच्या तेलाची अलाबास्त्री कुपी फोडून येशूच्या डोक्यावर ओतलीमार्क 14:3
    वचने
    मार्क 14:3येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क