Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › विश्वासघातकी आणि फितूर

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये विश्वासघातकी आणि फितूर

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 26 उतारे, ओळीनुसार.

यहूदा

  • बारा जणांपैकी एक, यहूदा इस्कर्योत, “जो पुढे विश्वासघात करणारा निघाला”लूक 6:16
    वचने
    लूक 6:16याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
  • पैशाची थैली त्याच्याकडे असल्यामुळे तो तिच्यातून काढून घेत असेयोहा 12:6
    वचने
    योहा 12:6त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला.
  • त्याने मुख्य याजकांना विचारले की ते काय देतील: चांदीची तीस नाणीमत्त 26:14–15
    वचने
    मत्त 26:14–15बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली.
  • तेव्हापासून तो लोकसमुदायापासून दूर संधी शोधत राहिलामत्त 26:16, मार्क 14:11, लूक 22:6
    वचने
    मत्त 26:16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
    मार्क 14:11जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला.
    लूक 22:6म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला.
  • भोजनाच्या वेळी येशू म्हणाला: “तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील”मत्त 26:21
    वचने
    मत्त 26:21जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.”
  • यहूदा: “रब्बी, तो मी आहे का?”मत्त 26:25
    वचने
    मत्त 26:25मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.”
  • येशूने बुडवलेला घास यहूदाला दिला, आणि यहूदा रात्रीच्या अंधारात बाहेर गेलायोहा 13:26, योहा 13:30
    वचने
    योहा 13:26येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.
    योहा 13:30मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.
  • यहूदाला ती बाग ठाऊक होती, कारण येशू तेथे अनेकदा आपल्या शिष्यांना भेटत असेयोहा 18:2
    वचने
    योहा 18:2ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
  • तो कंदील, मशाली आणि शस्त्रे घेतलेल्या शिपायांसह आलायोहा 18:3
    वचने
    योहा 18:3तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.
  • खूण: “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे”मत्त 26:48–49, मार्क 14:44–45
    वचने
    मत्त 26:48–49आणि त्यास धरून देणार्‍याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
    मार्क 14:44–45घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.” मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
  • “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”लूक 22:47–48
    वचने
    लूक 22:47–48तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”
  • पश्चात्तापाने भरून त्याने चांदी परत केली आणि गळफास घेतलामत्त 27:3–5
    वचने
    मत्त 27:3–5तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
  • त्या पैशाने कुंभाराचे शेत विकत घेतले, ज्याला रक्ताचे शेत म्हणतातमत्त 27:7–8
    वचने
    मत्त 27:7–8तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात.
  • प्रेषितांच्या कृत्यांत त्या शेताला हकलदमा म्हटले आहेप्रेषि 1:18–19
    वचने
    प्रेषि 1:18–19(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली. हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.)

इतर

  • बेथेलच्या एका माणसाने हेरांना आत जाण्याचा मार्ग दाखवला; त्याचे कुटुंब वाचलेशास्ते 1:23–25
    वचने
    शास्ते 1:23–25योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; आणि त्यांनी त्यास म्हटले, “नगरात कसे जायचे ते आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.” तेव्हा त्याने त्यांना नगरात जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली, पण त्या मनुष्यास व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.
  • प्रत्येक पलिष्टी सरदाराने त्याच्या शक्तीच्या रहस्यासाठी दलीलेला चांदी देऊ केलीशास्ते 16:5
    वचने
    शास्ते 16:5पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे चांदीची नाणी देऊ.”
  • शमशोनाने आपले रहस्य सांगितल्यावर तिने त्यांना बोलावले, आणि ते पैसे घेऊन आलेशास्ते 16:18
    वचने
    शास्ते 16:18जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.
  • नोब येथील याजकाने दावीदाला मदत केली असे अदोमी दवेगाने शौलाला सांगितले1 शमु 22:9–10
    वचने
    1 शमु 22:9–10मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले; त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.”
  • कईलकर आपल्याला शौलाच्या हाती देतील हे दावीदाला समजते1 शमु 23:12
    वचने
    1 शमु 23:12मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
  • दावीदाचा मंत्री अहिथोफेल अबशालोमाच्या कटात सामील झाला2 शमु 15:12, 2 शमु 15:31
    वचने
    2 शमु 15:12अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.
    2 शमु 15:31एकाने दावीदाला सांगितले अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे. तेव्हा दावीदाने देवाची करूणा भाकली तो म्हणाला, परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.
  • आपला सल्ला मानला गेला नाही तेव्हा अहिथोफेल घरी गेला आणि त्याने गळफास घेतला2 शमु 17:23
    वचने
    2 शमु 17:23इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क