Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › मीठ

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये मीठ

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 21 उतारे, ओळीनुसार.

  • लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले आणि ती मिठाचा खांब झालीउत्प 19:26
    वचने
    उत्प 19:26परंतु लोटाची पत्नी त्याच्यामागे होती, तिने मागे वळून पाहिले, आणि ती मिठाचा खांब झाली.
  • अळणी अन्न मिठाशिवाय खाल्ले जाते काय?ईयो 6:6
    वचने
    ईयो 6:6ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय?
  • अलीशाने यरीहोच्या झऱ्यात मीठ टाकले2 राजे 2:20–21
    वचने
    2 राजे 2:20–21अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले. अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
  • अबीमलेखाने शखेम उद्ध्वस्त केले आणि त्यावर मीठ पेरलेशास्ते 9:45
    वचने
    शास्ते 9:45अबीमलेखाने दिवसभर त्या नगराशी लढाई केली. त्याने शहराचा ताबा घेतला व त्यातील लोकांस जिवे मारले, आणि नगर उद्‌ध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.
  • नवजात बाळांना मिठाने चोळले जाईयहे 16:4
    वचने
    यहे 16:4तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.
  • पारसी राजाने मंदिरासाठी अमर्याद मीठ मंजूर केलेएज्रा 6:9, एज्रा 7:22
    वचने
    एज्रा 6:9स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या.
    एज्रा 7:22एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यंत, गहू शंभर कोरपर्यंत, द्राक्षरस शंभर बथपर्यंत, तेल शंभर बथपर्यंत, अमर्याद मीठ द्यावे.

उपासनेत

  • प्रत्येक अन्नार्पणात मीठ घातले जाईलेवी 2:13
    वचने
    लेवी 2:13तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
  • याजक होमार्पणांवर मीठ शिंपडतयहे 43:24
    वचने
    यहे 43:24तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील.
  • मिठाचा करारगण 18:19, 2 इति 13:5
    वचने
    गण 18:19“इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
    2 इति 13:5दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.

ठिकाणे

  • क्षार समुद्र, इस्राएलाची पूर्व सीमाउत्प 14:3, गण 34:12, यहो 15:2
    वचने
    उत्प 14:3नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
    गण 34:12आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.
    यहो 15:2आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
  • यहूदाच्या रानातील मिठाचे नगरयहो 15:62
    वचने
    यहो 15:62आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
  • क्षार खोऱ्यात अदोमाशी लढाया2 शमु 8:13, 2 राजे 14:7
    वचने
    2 शमु 8:13क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला.
    2 राजे 14:7त्याने मिठाच्या खोऱ्यात दहाहजार अदोम्यांना मारले, या व्यतिरिक्त या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “यकथेल” ठेवले. अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.

वचने

  • ज्या मिठाचा खारटपणा गेला ते काही कामाचे नाहीमत्त 5:13, लूक 14:34
    वचने
    मत्त 5:13तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.
    लूक 14:34मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?
  • आपल्यामध्ये मीठ असू द्या, आणि शांतीने राहामार्क 9:50
    वचने
    मार्क 9:50“मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”
  • तुमचे बोलणे कृपायुक्त, मिठाने रुचकर केलेले असू द्याकल 4:6
    वचने
    कल 4:6तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क