Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › वाढदिवस

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये वाढदिवस

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 8 उतारे, ओळीनुसार.

  • फारोच्या वाढदिवशी त्याने आपल्या अधिकाऱ्यांसाठी मेजवानी दिलीउत्प 40:20
    वचने
    उत्प 40:20तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.
  • त्या दिवशी त्याने प्यालेबरदाराला पुन्हा कामावर घेतले आणि भटाऱ्याला फाशी दिलेउत्प 40:21–22
    वचने
    उत्प 40:21–22त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला. परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.
  • हेरोदाच्या वाढदिवशी त्याने गालीलातील प्रमुखांसाठी मेजवानी दिलीमार्क 6:21
    वचने
    मार्क 6:21मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली.
  • हेरोदीयाच्या मुलीने नाच केला आणि योहानाचे शिर मागितलेमत्त 14:6–8
    वचने
    मत्त 14:6–8हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.”
  • ईयोबाने आपल्या जन्मदिवसाला शाप दिलाईयो 3:1–3
    वचने
    ईयो 3:1–3यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. तो (ईयोब) म्हणाला, “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो.
  • यिर्मया: ज्या दिवशी मी जन्मलो तो दिवस शापित असोयिर्म 20:14, यिर्म 20:18
    वचने
    यिर्म 20:14मी जन्मलो तो दिवस शापित असो. ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.
    यिर्म 20:18मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?
  • चांगले नाव सुगंधी तेलापेक्षा चांगले, आणि जन्मदिवसापेक्षा मरणदिवसउप 7:1
    वचने
    उप 7:1किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क