Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › जाती, भट्ट्या आणि भाजणे

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये जाती, भट्ट्या आणि भाजणे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 32 उतारे, ओळीनुसार.

जाती आणि दळणे

  • कर्जासाठी जाते गहाण म्हणून घेऊ नयेअनु 24:6
    वचने
    अनु 24:6कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी गाहाण म्हणून ठेवून घेऊ नये, नाहीतर त्याचा जीवच गहाण ठेवून घेतल्यासारखे होईल.
  • मिसरात सर्वांत हलकी दासी जात्यावर दळत असेनिर्ग 11:5
    वचने
    निर्ग 11:5आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.
  • मान्ना जात्यावर दळला जाई किंवा उखळात कुटला जाईगण 11:8
    वचने
    गण 11:8लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.
  • तेबेस येथे एका स्त्रीने अबीमलेखावर जात्याची वरची तळी टाकलीशास्ते 9:53, 2 शमु 11:21
    वचने
    शास्ते 9:53तेव्हा एका स्त्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकली.
    2 शमु 11:21तेबेसमध्ये यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्यास हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यामध्ये मारला गेला.
  • आंधळा केलेला आणि बेड्या घातलेला शमशोन गज्जाच्या तुरुंगात दळण दळत असेशास्ते 16:21
    वचने
    शास्ते 16:21पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.
  • येशू एकत्र दळणाऱ्या दोन स्त्रियांविषयी बोलतोमत्त 24:41, लूक 17:35
    वचने
    मत्त 24:41दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
    लूक 17:35दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.
  • येशू: गळ्यात मोठे जाते बांधून बुडवले जाणे बरेमत्त 18:6
    वचने
    मत्त 18:6परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.
  • यिर्मया जात्यांचा आवाज वधू-वरांच्या आवाजांबरोबर गणतोयिर्म 25:10
    वचने
    यिर्म 25:10त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन.
  • विलापगीत: तरुण जात्यावर कष्ट करतातविला 5:13
    वचने
    विला 5:13आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.

भट्ट्या आणि भाजणे

  • बेडूक मिसराच्या भट्ट्यांत आणि काथवटींत शिरणार होतेनिर्ग 8:3
    वचने
    निर्ग 8:3नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
  • अन्नार्पणे भट्टीत भाजता येत किंवा तव्यावर शिजवता येतलेवी 2:4, लेवी 7:9
    वचने
    लेवी 2:4जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.
    लेवी 7:9भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
  • अशुद्ध मढ्याचा स्पर्श झालेली भट्टी फोडून टाकावी लागेलेवी 11:35
    वचने
    लेवी 11:35त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
  • नियमशास्त्रातील शाप: दहा स्त्रिया एकाच भट्टीत भाकरी भाजतीललेवी 26:26
    वचने
    लेवी 26:26मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
  • साराने तीन मापे सपीठ मळून भाकरी करायच्या आहेतउत्प 18:6
    वचने
    उत्प 18:6अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
  • लोटाने आपल्या पाहुण्यांसाठी बेखमीर भाकरी भाजल्याउत्प 19:3
    वचने
    उत्प 19:3परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.
  • फारोच्या मुख्य भटाऱ्याला डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्यांचे स्वप्न पडलेउत्प 40:16–17
    वचने
    उत्प 40:16–17स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या. सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”
  • मिसर सोडताना इस्राएलाने बरोबर नेलेल्या कणकेच्या बेखमीर भाकरी भाजल्यानिर्ग 12:34, निर्ग 12:39
    वचने
    निर्ग 12:34इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली.
    निर्ग 12:39त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही;
  • शब्बाथापूर्वी: “तुम्हास भाजावयाचे ते भाजा”निर्ग 16:23
    वचने
    निर्ग 16:23तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”
  • परमेश्वरापुढील सोन्याच्या मेजासाठी बारा भाकरी भाजल्या जातलेवी 24:5–6
    वचने
    लेवी 24:5–6तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
  • शमुवेल: राजा तुमच्या मुलींना आचारी आणि भटारी म्हणून नेईल1 शमु 8:13
    वचने
    1 शमु 8:13तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.
  • एन-दोर येथील भूत जाणणाऱ्या स्त्रीने शौलासाठी पीठ मळून बेखमीर भाकरी भाजल्या1 शमु 28:24
    वचने
    1 शमु 28:24त्या स्त्रीच्या घरात पुष्ट वासरू होते, ते तिने मोठ्या घाईने कापले; तिने पीठ घेतले व ते मळून त्याच्या बेखमीर भाकरी भाजल्या.
  • तामारेने कणीक मळून अम्नोनासाठी पोळ्या भाजल्या2 शमु 13:8
    वचने
    2 शमु 13:8तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहत होता.
  • जाग आल्यावर एलीयाला निखाऱ्यांवर भाजलेली भाकर दिसली1 राजे 19:6
    वचने
    1 राजे 19:6एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.
  • यशया: लाकडाच्या एका भागाने भाकर भाजली जाते, आणि उरलेल्याची मूर्ती होतेयश 44:15, यश 44:19
    वचने
    यश 44:15मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो.
    यश 44:19कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय?
  • यिर्मयाला भटाऱ्यांच्या गल्लीतून दररोज एक भाकर मिळत असेयिर्म 37:21
    वचने
    यिर्म 37:21म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.
  • यरूशलेमेच्या तटबंदीला भट्टी बुरुज होतानहे 3:11, नहे 12:38
    वचने
    नहे 3:11हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
    नहे 12:38स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क