Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › मध

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये मध

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 22 उतारे, ओळीनुसार.

  • दुधामधाचे प्रवाह वाहणारा देशनिर्ग 3:8, लेवी 20:24
    वचने
    निर्ग 3:8त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
    लेवी 20:24मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करून मी तुम्हास माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
  • जैतुनाचे तेल आणि मध यांचा देशअनु 8:8
    वचने
    अनु 8:8ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.
  • मान्न्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होतीनिर्ग 16:31
    वचने
    निर्ग 16:31इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.
  • मधाचे अर्पण जाळायचे नव्हतेलेवी 2:11
    वचने
    लेवी 2:11खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही.
  • खडकातून मधअनु 32:13, स्तोत्र 81:16
    वचने
    अनु 32:13परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
    स्तोत्र 81:16मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.

कथांमध्ये

  • याकोबाने मिसरला भेट म्हणून थोडा मध पाठवलाउत्प 43:11
    वचने
    उत्प 43:11मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.”
  • शमशोनाने सिंहाच्या मढ्यातून मध खाल्लाशास्ते 14:8–9
    वचने
    शास्ते 14:8–9काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहायला बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला. त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांनाही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्याने सांगितले नाही.
  • शौलाच्या शपथेविरुद्ध योनाथानाने रानात मध चाखला1 शमु 14:25–27, 1 शमु 14:43
    वचने
    1 शमु 14:25–27देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता; वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते. परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.
    1 शमु 14:43मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.”
  • थोडा मध चाखल्यावर त्याचे डोळे तेजस्वी झाले1 शमु 14:29
    वचने
    1 शमु 14:29तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?
  • मित्रांनी दावीदाच्या भुकेल्या माणसांसाठी मध आणला2 शमु 17:29
    वचने
    2 शमु 17:29गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.
  • यराबामाची पत्नी संदेष्ट्याकडे मधाचे भांडे घेऊन गेली1 राजे 14:3
    वचने
    1 राजे 14:3यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
  • यहूदा सोरेशी मधाचा व्यापार करत असेयहे 27:17
    वचने
    यहे 27:17यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
  • योहान टोळ आणि रानमध खात असेमत्त 3:4
    वचने
    मत्त 3:4या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.

वचने

  • माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहेनीति 24:13
    वचने
    नीति 24:13माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
  • मध मिळाला तर जेवढा लागेल तेवढाच खानीति 25:16, नीति 25:27
    वचने
    नीति 25:16जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.
    नीति 25:27खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे.
  • तृप्त माणसाला मधाचा वीट येतो; भुकेल्याला कडूही गोड लागतेनीति 27:7
    वचने
    नीति 27:7जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.
  • पोळ्यातील मधापेक्षाही गोडस्तोत्र 19:10
    वचने
    स्तोत्र 19:10ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
  • माझ्या वधू, तुझ्या ओठांतून मधाच्या पोळ्यासारखा गोडवा पाझरतोगीत 4:11
    वचने
    गीत 4:11माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क