Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › किल्ल्या, मुद्रा, मुद्रेच्या अंगठ्या

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये किल्ल्या, मुद्रा, मुद्रेच्या अंगठ्या

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 27 उतारे, ओळीनुसार.

किल्ल्या आणि अडसर

  • एहूदाने राजा एग्लोनाच्या माडीची दारे आपल्यामागे बंद केलीशास्ते 3:23
    वचने
    शास्ते 3:23मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले.
  • सेवक वाट पाहत राहिले, मग त्यांनी किल्ली घेऊन दारे उघडलीशास्ते 3:24–25
    वचने
    शास्ते 3:24–25तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.” त्यांना मोठी काळजी वाटू लागली, आपण कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
  • लेवी रात्री देवाच्या घराची राखण करत आणि दररोज सकाळी ते उघडत1 इति 9:27
    वचने
    1 इति 9:27देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
  • यरूशलेमेच्या वेशी दारे, कड्या आणि अडसर लावून पुन्हा बांधल्यानहे 3:3
    वचने
    नहे 3:3हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.

मुद्रा आणि मुद्रेच्या अंगठ्या

  • यहूदाने आपली मुद्रा, गोफ आणि काठी तामारेकडे गहाण म्हणून ठेवलीउत्प 38:18
    वचने
    उत्प 38:18यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.
  • तामार: “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख”उत्प 38:25
    वचने
    उत्प 38:25जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.”
  • फारोने आपली मुद्रेची अंगठी योसेफाच्या बोटात घातलीउत्प 41:42
    वचने
    उत्प 41:42मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
  • ईजबेलने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्याच्या मुद्रेने त्यांवर शिक्का मारला1 राजे 21:8
    वचने
    1 राजे 21:8ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.
  • अहश्वेरोशाने आपली मुद्रेची अंगठी हामानाला दिलीएस्ते 3:10
    वचने
    एस्ते 3:10तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली.
  • हामानाचा हुकूम राजाच्या नावाने लिहून अंगठीने मुद्रित केलाएस्ते 3:12
    वचने
    एस्ते 3:12त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली.
  • हामानाकडून परत घेतलेली अंगठी मर्दखयाला दिलीएस्ते 8:2
    वचने
    एस्ते 8:2राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले.
  • राजाच्या मुद्रेच्या अंगठीने मुद्रित केलेला हुकूम रद्द करता येत नाहीएस्ते 8:8
    वचने
    एस्ते 8:8आता राजाच्या नावाने यहूद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहर उमटवा. कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही.”
  • मर्दखयाने पत्रे मुद्रित केली आणि घोडेस्वार जासुदांबरोबर पाठवलीएस्ते 8:10
    वचने
    एस्ते 8:10मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठवले.
  • सिंहांची गुहा राजाच्या आणि त्याच्या सरदारांच्या अंगठ्यांनी मुद्रित केलीदानि 6:17
    वचने
    दानि 6:17त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला, मग राजाने आपली आणि सरदाराची मुद्रा घेवून त्यावर शिक्का मारला तो यासाठी की दानीएलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही.
  • पुढारी, लेवी आणि याजक यांच्या नावांनी मुद्रित केलेला लेखी करारनहे 9:38, नहे 10:1
    वचने
    नहे 9:38या सगळया गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्ताऐवजावर आहेत.”
    नहे 10:1त्या मोहरबंद करारातील नावे पुढीलप्रमाणेः प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नहेम्या आणि याजक सिदकीया यांनी सही केली,
  • यिर्मयाने खरेदीखतावर सही करून ते मुद्रित केले: एक मुद्रित प्रत, एक उघडी प्रतयिर्म 32:10–11
    वचने
    यिर्म 32:10–11नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले. पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,
  • खते पुष्कळ काळ टिकावीत म्हणून मातीच्या भांड्यात ठेवलीयिर्म 32:14
    वचने
    यिर्म 32:14सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, हे मोहोरबंद केलेले खरेदीखत व मोहोरबंद नसलेले खरेदीखत यांच्या पावत्या घे. त्या दीर्घकाळ राहाव्या म्हणून नवीन पात्रात घालून ठेव.
  • धोंडेवर मुद्रा करून आणि पहारा ठेवून येशूची कबर बंदोबस्तात ठेवलीमत्त 27:66
    वचने
    मत्त 27:66म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.

मुद्रा कोरतात तसे कोरलेले

  • इस्राएलाच्या मुलांची नावे मुद्रा कोरतात तशी कोरलेले दोन गोमेद दगडनिर्ग 28:9, निर्ग 28:11, निर्ग 39:6
    वचने
    निर्ग 28:9मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
    निर्ग 28:11रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत.
    निर्ग 39:6मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
  • उरपटाचे बारा दगड, प्रत्येकावर मुद्रा कोरतात तसे एका वंशाचे नावनिर्ग 28:21, निर्ग 39:14
    वचने
    निर्ग 28:21ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
    निर्ग 39:14इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
  • मुद्रा कोरतात तशी कोरलेली सोन्याची पट्टी: परमेश्वरासाठी पवित्रनिर्ग 28:36, निर्ग 39:30
    वचने
    निर्ग 28:36शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
    निर्ग 39:30मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
  • गीतरत्नातील वचन: “तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे” मला ठेवगीत 8:6
    वचने
    गीत 8:6तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क