आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये जनगणना
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 21 उतारे, ओळीनुसार.
रानात
- सेवा करू शकणाऱ्या वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणना झालीगण 1:2–3
वचने
गण 1:2–3सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर. वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
- गणती झालेल्या प्रत्येक पुरुषाने, श्रीमंत असो की गरीब, अर्धा शेकेल दिलानिर्ग 30:13–15, निर्ग 38:26
वचने
निर्ग 30:13–15जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे. वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे. तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;
निर्ग 38:26वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
- पहिली गणना: 603,550गण 1:46
वचने
गण 1:46ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
- लेवींची इतर वंशांबरोबर गणना झाली नाहीगण 1:47–49
वचने
गण 1:47–49इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती. परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको.
- एक महिन्याचे आणि त्याहून मोठे लेवी पुरुष: 22,000गण 3:39
वचने
गण 3:39लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.
- दुसरी गणना, यार्देनेजवळ: 601,730गण 26:2, गण 26:51
- पहिल्या गणनेतील कालेब आणि यहोशवा यांच्याखेरीज कोणीही उरले नाहीगण 26:64–65
वचने
गण 26:64–65खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
दावीदाची जनगणना
- गणनेला नऊ महिने आणि वीस दिवस लागले2 शमु 24:8
वचने
2 शमु 24:8सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले.
- शमुवेल: इस्राएलात 800,000 आणि यहूदात 500,0002 शमु 24:9
वचने
2 शमु 24:9यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
- इतिहास: इस्राएलात 1,100,000 आणि यहूदात 470,0001 इति 21:5
वचने
1 इति 21:5मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
- यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांना गणनेतून वगळले1 इति 21:6
वचने
1 इति 21:6पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
- गणनेनंतर दावीदाचे मन त्याला खाऊ लागले2 शमु 24:10
वचने
2 शमु 24:10हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
- ती संख्या राजा दावीदाच्या इतिहासग्रंथात नोंदली गेली नाही1 इति 27:24
वचने
1 इति 27:24सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.
इतर गणना
- तीस वर्षांचे आणि त्याहून मोठे लेवी: 38,0001 इति 23:3
वचने
1 इति 23:3तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
- शलमोनाने देशातील 153,600 परदेशी लोकांची गणना केली2 इति 2:17
वचने
2 इति 2:17शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
- परत आलेल्या बंदिवानांची संख्या 42,360 होतीएज्रा 2:64
वचने
एज्रा 2:64सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
- आगुस्ताने नावनोंदणीची आज्ञा दिली; क्वीरीनिय सिरीयाचा राज्यपाल होतालूक 2:1–2
वचने
लूक 2:1–2त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी. ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता.
- नावनोंदणीसाठी योसेफ आणि मरीया बेथलेहेमला गेलेलूक 2:3–5
वचने
लूक 2:3–5प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले. मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले.
- नावनोंदणीच्या दिवसांत गालीलकर यहूदा उठलाप्रेषि 5:37
वचने
प्रेषि 5:37त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले त्याचाही नाश झाला. व जितके त्यास मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क