आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये दीर्घ आयुष्ये
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 37 उतारे, ओळीनुसार.
- जलप्रलयापूर्वी परमेश्वर मनुष्याच्या दिवसांना मर्यादा घालतोउत्प 6:3
वचने
उत्प 6:3परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”
- एक स्तोत्र: आमचे आयुष्य सत्तर वर्षांचे, किंवा शक्ती असल्यास ऐंशीस्तोत्र 90:10
वचने
स्तोत्र 90:10आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
जलप्रलयापूर्वी
- आदाम 930 वर्षे जगलाउत्प 5:5
वचने
उत्प 5:5अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
- शेथ 912 वर्षे जगलाउत्प 5:8
वचने
उत्प 5:8शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
- अनोश 905 वर्षे जगलाउत्प 5:11
वचने
उत्प 5:11अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- केनान 910 वर्षे जगलाउत्प 5:14
वचने
उत्प 5:14केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
- महललेल 895 वर्षे जगलाउत्प 5:17
वचने
उत्प 5:17महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- यारेद 962 वर्षे जगलाउत्प 5:20
वचने
उत्प 5:20यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- हनोख: 365 वर्षे, आणि मग तो दिसेनासा झालाउत्प 5:23–24
वचने
उत्प 5:23–24हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला; हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
- मथुशलह 969 वर्षे जगलाउत्प 5:27
वचने
उत्प 5:27मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
- लामेख 777 वर्षे जगलाउत्प 5:31
वचने
उत्प 5:31लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
- नोहा जलप्रलयानंतर 350 वर्षे जगला, एकूण 950उत्प 9:28–29
वचने
उत्प 9:28–29पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला; नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.
जलप्रलयानंतर
- शेम: 100 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 500 वर्षेउत्प 11:10–11
वचने
उत्प 11:10–11ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला. अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला.
- अर्पक्षद: 35 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 403 वर्षेउत्प 11:12–13
वचने
उत्प 11:12–13अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला. शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
- शेलह: 30 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 403 वर्षेउत्प 11:14–15
वचने
उत्प 11:14–15जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
- एबर: 34 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 430 वर्षेउत्प 11:16–17
वचने
उत्प 11:16–17एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
- पेलेग: 30 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 209 वर्षेउत्प 11:18–19
वचने
उत्प 11:18–19पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
- नाहोर: 29 व्या वर्षी मुलगा, मग आणखी 119 वर्षेउत्प 11:24–25
वचने
उत्प 11:24–25नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
- तेरह 205 वर्षे जगला आणि हारानात मरण पावलाउत्प 11:32
वचने
उत्प 11:32तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
पुढील आयुष्ये
- सारा 127 वर्षे जगलीउत्प 23:1
वचने
उत्प 23:1सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली; ही सारेच्या आयुष्याची वर्षे होती.
- अब्राहाम 175 वर्षे जगलाउत्प 25:7
वचने
उत्प 25:7अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.
- इश्माएलही दीर्घायुषी होताउत्प 25:17
वचने
उत्प 25:17ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
- इसहाक 180 वर्षे जगलाउत्प 35:28
वचने
उत्प 35:28इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
- याकोब 147 वर्षे जगला, शेवटची सतरा वर्षे मिसरातउत्प 47:28
वचने
उत्प 47:28याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.
- योसेफ 110 व्या वर्षी मरण पावला आणि मिसरात त्याच्या शरीरात सुगंधी द्रव्ये भरलीउत्प 50:26
वचने
उत्प 50:26योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले.
- लेवी 137 वर्षे, कहाथ 133, अम्राम 137 वर्षे जगलेनिर्ग 6:16, निर्ग 6:18, निर्ग 6:20
वचने
निर्ग 6:16लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे हेः गेर्षोन, कहाथ, व मरारी.
निर्ग 6:18कहाथाचे पुत्रः अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षांचे होते.
निर्ग 6:20अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले, तिच्या पोटी त्यास अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.
- अहरोन 123 व्या वर्षी होर पर्वतावर मरण पावलागण 33:39
वचने
गण 33:39अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
- मोशे 120 व्या वर्षी मरण पावला, त्याची दृष्टी मंद झाली नव्हतीअनु 34:7
वचने
अनु 34:7मोशे मरण पावला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती.
- 85 वर्षांचा कालेब: मोशेने पाठवले त्या दिवसाइतकाच अजूनही बलवानयहो 14:10–11
वचने
यहो 14:10–11तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे. जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे.
- यहोशवा 110 व्या वर्षी मरण पावलायहो 24:29
वचने
यहो 24:29मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला.
- एली 98 वर्षांचा होता आणि त्याला दिसत नव्हते1 शमु 4:15
वचने
1 शमु 4:15तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते?
- ऐंशी वर्षांच्या बर्जिल्ल्याने राजा दावीदाला रसद पुरवली होती2 शमु 19:32
वचने
2 शमु 19:32बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला.
- याजक यहोयादा 130 व्या वर्षी मरण पावला2 इति 24:15
वचने
2 इति 24:15पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युवेळी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते.
- ईयोब आणखी 140 वर्षे जगला आणि त्याने चार पिढ्या पाहिल्याईयो 42:16–17
वचने
ईयो 42:16–17अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला. नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”
- चौऱ्याऐंशी वर्षांपर्यंत विधवा असलेली हन्ना कधीच मंदिर सोडत नसेलूक 2:36–37
वचने
लूक 2:36–37तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क