आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये टोळ
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 14 उतारे, ओळीनुसार.
- टोळ, नाकतोडे, खरपुडे आणि तृणटोळ खाण्यास परवानगी होतीलेवी 11:22
वचने
लेवी 11:22त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.
- बाप्तिस्मा करणारा योहान टोळ आणि रानमध खात असेमत्त 3:4, मार्क 1:6
- टोळांना राजा नसतो, तरी ते रांगेने पुढे जातातनीति 30:27
वचने
नीति 30:27टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात.
- दुष्काळ, करपा, बुरशी आणि टोळ यांविषयी शलमोन प्रार्थना करतो1 राजे 8:37
वचने
1 राजे 8:37कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील.
- तू पुष्कळ बी पेरशील, पण टोळ ते खाऊन टाकतीलअनु 28:38
वचने
अनु 28:38तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.
मिसरातील पीडा
- देश व्यापून घरे भरून टाकणाऱ्या टोळांविषयी मोशेने इशारा दिलानिर्ग 10:4–6
वचने
निर्ग 10:4–6जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन. ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्यास टोळ खाऊन टाकतील. शेतांतील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील. ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला.
- पूर्वेच्या वाऱ्याने सकाळपर्यंत ते आणलेनिर्ग 10:13
वचने
निर्ग 10:13मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
- देश काळा पडला; काहीही हिरवे उरले नाहीनिर्ग 10:14–15
वचने
निर्ग 10:14–15ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही.
- पश्चिमेच्या वाऱ्याने त्यांना तांबड्या समुद्रात उडवून दिलेनिर्ग 10:19
वचने
निर्ग 10:19तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
तुलना
- योएल: एका टोळाने जे उरवले ते पुढच्याने खाल्लेयोए 1:4
वचने
योए 1:4कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
- मिद्यानी टोळधाडीसारखे आलेशास्ते 6:5, शास्ते 7:12
वचने
शास्ते 6:5जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.
शास्ते 7:12तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.
- हेरांना अनाकाच्या वंशजांपुढे आपण तृणटोळांसारखे वाटलोगण 13:33
वचने
गण 13:33आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क