Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › चाळीस ही संख्या

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये चाळीस ही संख्या

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 31 उतारे, ओळीनुसार.

चाळीस दिवस

  • चाळीस दिवस आणि चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पडलाउत्प 7:4, उत्प 7:12, उत्प 7:17
    वचने
    उत्प 7:4आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”
    उत्प 7:12पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता.
    उत्प 7:17मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले.
  • चाळीस दिवसांनंतर नोहाने तारवाची खिडकी उघडलीउत्प 8:6
    वचने
    उत्प 8:6चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली
  • याकोबाच्या शरीरात सुगंधी द्रव्ये भरायला चाळीस दिवस लागलेउत्प 50:3
    वचने
    उत्प 50:3त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.
  • मोशे डोंगरावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्री राहिलानिर्ग 24:18, निर्ग 34:28, अनु 9:9
    वचने
    निर्ग 24:18मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
    निर्ग 34:28मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
    अनु 9:9त्याचे असे झाले; परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
  • हेर चाळीस दिवसांनंतर परत आलेगण 13:25
    वचने
    गण 13:25त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
  • गल्याथ चाळीस दिवस सकाळी आणि संध्याकाळी पुढे येत असे1 शमु 17:16
    वचने
    1 शमु 17:16तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.
  • एलीया चाळीस दिवस आणि रात्री चालत होरेबास गेला1 राजे 19:8
    वचने
    1 राजे 19:8तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
  • योना: आणखी चाळीस दिवसांनी निनवे उलथून टाकले जाईलयोना 3:4
    वचने
    योना 3:4योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.”
  • येशूने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केलामत्त 4:2
    वचने
    मत्त 4:2चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
  • पुनरुत्थानानंतर येशू चाळीस दिवसांच्या काळात दर्शन देत राहिलाप्रेषि 1:3
    वचने
    प्रेषि 1:3मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.

चाळीस वर्षे

  • इस्राएलाने रानात चाळीस वर्षे मान्ना खाल्लानिर्ग 16:35
    वचने
    निर्ग 16:35इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत खात होते.
  • भटकण्याची चाळीस वर्षे, हेरगिरीच्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्षगण 14:34
    वचने
    गण 14:34तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.
  • इसहाकाने चाळिसाव्या वर्षी रिबकेशी लग्न केलेउत्प 25:20
    वचने
    उत्प 25:20इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले.
  • मोशे चाळीस वर्षांचा असताना आपल्या लोकांना भेटायला गेला; चाळीस वर्षांनंतर जळणारे झुडूपप्रेषि 7:23, प्रेषि 7:30
    वचने
    प्रेषि 7:23मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.
    प्रेषि 7:30मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.
  • अनेक न्यायाधीशांच्या काळात देशाला चाळीस वर्षे विसावा मिळालाशास्ते 3:11, शास्ते 5:31, शास्ते 8:28
    वचने
    शास्ते 3:11त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
    शास्ते 5:31हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.
    शास्ते 8:28मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
  • पलिष्ट्यांनी इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केलेशास्ते 13:1
    वचने
    शास्ते 13:1तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
  • एलीने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला1 शमु 4:18
    वचने
    1 शमु 4:18आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
  • पौल म्हणतो, शौलाच्या अमलाखाली चाळीस वर्षेप्रेषि 13:21
    वचने
    प्रेषि 13:21मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता.
  • दावीदाने चाळीस वर्षे राज्य केले: हेब्रोनात सात, यरूशलेमेत तेहतीस2 शमु 5:4, 1 राजे 2:11
    वचने
    2 शमु 5:4दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
    1 राजे 2:11हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
  • शलमोनाने चाळीस वर्षे राज्य केले1 राजे 11:42
    वचने
    1 राजे 11:42यरूशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले
  • योवाशाने यरूशलेमेत चाळीस वर्षे राज्य केले2 राजे 12:1
    वचने
    2 राजे 12:1येहूच्या सातव्या वर्षी योवाश राज्य करू लागला. त्याने यरूशलेमेवर चाळीस वर्षे राज्य केले. योवाशाच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती.

चाळीस फटके

  • नियमशास्त्राने चाळीसपेक्षा अधिक फटक्यांना परवानगी दिली नाहीअनु 25:3
    वचने
    अनु 25:3चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.
  • पौलाला पाच वेळा एक कमी चाळीस फटके मिळाले2 करिं 11:24
    वचने
    2 करिं 11:24पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके बसले.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क