शोधा › विषय › विटा आणि वीटभट्ट्या
आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये विटा आणि वीटभट्ट्या
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 15 उतारे, ओळीनुसार.
- बाबेल येथे: “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू”उत्प 11:3
वचने
उत्प 11:3ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
- त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरलेउत्प 11:3
वचने
उत्प 11:3ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
- यहेज्केलाने एका विटेवर यरूशलेम नगराचे चित्र काढलेयहे 4:1
वचने
यहे 4:1परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
- दावीदाने अम्मोन्यांना वीटभट्ट्यांवर कामाला लावले2 शमु 12:31
वचने
2 शमु 12:31राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.
- यिर्मयाने तहपन्हेस येथील फारोच्या महालाच्या विटांच्या फरसबंदीत दगड पुरलेयिर्म 43:9
वचने
यिर्म 43:9“तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपन्हेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशदाराजवळ पादचारीमार्गावर यहूदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपवून ठेव.
- यशयातील बढाई: “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु”यश 9:10
वचने
यश 9:10“विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
- विटांच्या वेद्यांवर जाळलेल्या धुपाचा यशया उल्लेख करतोयश 65:3
वचने
यश 65:3ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.
- नहूम निनवेला: चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरुस्त करनहू 3:14
वचने
नहू 3:14वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर.
मिसरात
- विटा आणि चुना यांच्या कामाने इस्राएलांचे जीवन कडू केलेनिर्ग 1:14
वचने
निर्ग 1:14अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
- त्यांनी पिथोम आणि रामसेस ही भांडारनगरे बांधलीनिर्ग 1:11
वचने
निर्ग 1:11म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली;
- फारो: यापुढे गवत नाही, पण विटा तितक्याचनिर्ग 5:7–8
वचने
निर्ग 5:7–8तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा. तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.
- गवताऐवजी धसकट गोळा करण्यासाठी लोक मिसरभर पसरलेनिर्ग 5:12
वचने
निर्ग 5:12म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.
- विटांचे प्रमाण कमी पडल्याबद्दल इस्राएली नायकांना मार बसलानिर्ग 5:14
वचने
निर्ग 5:14मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
- “तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता”निर्ग 5:16
वचने
निर्ग 5:16तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”
- “पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम” कमी करू नकानिर्ग 5:18–19
वचने
निर्ग 5:18–19आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हास गवत काही मिळायचे नाही, परंतु पूर्वीप्रमानेच विटा तुम्ही केल्या पाहिजेत. आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क