Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › हिम

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये हिम

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 17 उतारे, ओळीनुसार.

  • हिम पडत असलेल्या दिवशी बनायाने खड्ड्यात एका सिंहाला मारले2 शमु 23:20
    वचने
    2 शमु 23:20यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
  • लबानोनाचे हिम कधी त्याच्या उतारांवरून नाहीसे होते काय?यिर्म 18:14
    वचने
    यिर्म 18:14लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?
  • बर्फाने आणि वितळणाऱ्या हिमाने गढूळ झालेले ओढेईयो 6:16
    वचने
    ईयो 6:16त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.
  • देव हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतोईयो 37:6
    वचने
    ईयो 37:6तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
  • तू हिमाच्या भांडारात गेला आहेस काय?ईयो 38:22
    वचने
    ईयो 38:22मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
  • तो लोकरीसारखे हिम पसरतोस्तोत्र 147:16
    वचने
    स्तोत्र 147:16तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
  • पाऊस आणि हिम पृथ्वी भिजवून तिला अंकुर फुटवतातयश 55:10
    वचने
    यश 55:10कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
  • सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणेस्तोत्र 68:14
    वचने
    स्तोत्र 68:14तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.

नीतिसूत्रांतील वचने

  • विश्वासू निरोप्या कापणीच्या वेळच्या थंड हिमासारखा असतोनीति 25:13
    वचने
    नीति 25:13कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
  • उन्हाळ्यात हिमासारखा, सन्मान मूर्खाला शोभत नाहीनीति 26:1
    वचने
    नीति 26:1उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.
  • हिम पडले तरी तिला भीती नसते; तिच्या घरचे किरमिजी वस्त्र घालतातनीति 31:21
    वचने
    नीति 31:21आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.

हिमासारखे पांढरे

  • मोशेचा हात, मिर्याम आणि गेहजी: महारोगाने हिमासारखे पांढरेनिर्ग 4:6, गण 12:10, 2 राजे 5:27
    वचने
    निर्ग 4:6मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला;
    गण 12:10ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.
    2 राजे 5:27नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.
  • ईयोब: मी हिमाने स्वतःला धुतले तरीईयो 9:30
    वचने
    ईयो 9:30मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
  • दावीदाची प्रार्थना: मला धू, म्हणजे मी हिमापेक्षाही पांढरा होईनस्तोत्र 51:7
    वचने
    स्तोत्र 51:7मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
  • कबरेजवळचा देवदूत: हिमासारखी पांढरी वस्त्रेमत्त 28:3
    वचने
    मत्त 28:3त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क