Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › पाय आणि हात धुणे

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये पाय आणि हात धुणे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 27 उतारे, ओळीनुसार.

  • अब्राहाम आपल्या पाहुण्यांना पाय धुण्यासाठी आणि विसावा घेण्यासाठी पाणी देतोउत्प 18:4
    वचने
    उत्प 18:4थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.
  • लोट: “आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा”उत्प 19:2
    वचने
    उत्प 19:2तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”
  • लाबानाच्या घरी अब्राहामाच्या चाकराला आणि त्याच्या माणसांना पाय धुण्यासाठी पाणी दिले जातेउत्प 24:32
    वचने
    उत्प 24:32तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले.
  • योसेफाचा कारभारी भावांना पाय धुण्यासाठी पाणी देतोउत्प 43:24
    वचने
    उत्प 43:24मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.
  • गिबा येथील म्हाताऱ्याच्या घरी त्यांनी पाय धुतले, खाल्ले आणि प्यालेशास्ते 19:21
    वचने
    शास्ते 19:21तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.
  • अबीगईल: माझ्या स्वामीच्या सेवकांचे पाय धुण्यास मी तयार आहे1 शमु 25:41
    वचने
    1 शमु 25:41तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”
  • दावीद उरीयाला: घरी जा आणि पाय धुऊन आराम कर2 शमु 11:8
    वचने
    2 शमु 11:8मग दावीद उरीयाला म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली.
  • दावीद दूर असताना मफीबोशेथाने आपल्या पायांची निगा राखली नव्हती2 शमु 19:24
    वचने
    2 शमु 19:24शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
  • गीतरत्न: “मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?”गीत 5:3
    वचने
    गीत 5:3मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू? मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?

शुभवर्तमानांत

  • येशू शिमोनाला: तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाहीसलूक 7:44
    वचने
    लूक 7:44तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले.
  • एका स्त्रीने आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी पुसलेलूक 7:38
    वचने
    लूक 7:38आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
  • मरीयेने जटामांसीच्या तेलाने येशूच्या पायांना अभिषेक केला आणि आपल्या केसांनी ते पुसलेयोहा 12:3
    वचने
    योहा 12:3तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.
  • भोजनाच्या वेळी येशूने कमरेला रुमाल गुंडाळला आणि शिष्यांचे पाय धुतलेयोहा 13:4–5
    वचने
    योहा 13:4–5येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
  • पेत्र: “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत”योहा 13:8
    वचने
    योहा 13:8पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
  • येशू: ज्याने स्नान केले आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असतेयोहा 13:10
    वचने
    योहा 13:10येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.”
  • “तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत”योहा 13:14
    वचने
    योहा 13:14मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.
  • पवित्र जनांचे पाय धुणारी म्हणून ओळखली जाणारी विधवा1 तीम 5:10
    वचने
    1 तीम 5:10जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.

हात धुणे

  • सेवा करण्यापूर्वी याजक पितळी गंगाळात हात आणि पाय धूतनिर्ग 30:18–21, निर्ग 40:31
    वचने
    निर्ग 30:18–21“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हातपाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हातपाय धुवावेत; दर्शनमंडपामध्ये व वेदीजवळ सेवा करण्यास जाताना म्हणजे परमेश्वराकरता हव्य जाळण्यासाठी जातेवेळी त्यांनी आपले हातपाय धुवावेत; नाहीतर ते मरतील. अहरोन व त्याचे वंशज ह्याच्यासाठी हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी व्हावा.”
    निर्ग 40:31मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत;
  • मारेकरी माहीत नसलेल्या खुनासाठी वडील कालवडीवर आपले हात धुतातअनु 21:1, अनु 21:6
    वचने
    अनु 21:1तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही
    अनु 21:6मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.
  • पिलात लोकांसमोर हात धुतो: “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे”मत्त 27:24
    वचने
    मत्त 27:24लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.”
  • वडिलांच्या संप्रदायानुसार परूशी हात धुतल्याशिवाय जेवत नाहीतमार्क 7:3–4
    वचने
    मार्क 7:3–4कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात.
  • येशूचे शिष्य हात न धुता का जेवतात असे ते विचारतातमत्त 15:2, मार्क 7:5
    वचने
    मत्त 15:2“तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
    मार्क 7:5मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
  • जेवणापूर्वी येशूने हात धुतले नाहीत याचे एका परूश्याला आश्चर्य वाटलेलूक 11:38
    वचने
    लूक 11:38परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परूश्याला फार आश्चर्य वाटले.
  • काना येथे शुद्धीकरणाच्या विधीसाठी पाणी ठेवलेले दगडाचे सहा रांजणयोहा 2:6
    वचने
    योहा 2:6तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क