Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › तारे

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये तारे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 21 उतारे, ओळीनुसार.

  • देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, आणि तारेही केलेउत्प 1:16
    वचने
    उत्प 1:16दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले.
  • शक्य असल्यास तारे मोज असे अब्राहामाला सांगितलेउत्प 15:5
    वचने
    उत्प 15:5मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”
  • तारे आणि वाळू यांच्याइतके वंशजउत्प 22:17, अनु 1:10
    वचने
    उत्प 22:17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.
    अनु 1:10आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
  • तो ताऱ्यांची संख्या ठरवतो आणि प्रत्येकाला नाव देतोस्तोत्र 147:4
    वचने
    स्तोत्र 147:4तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
  • तेजात एक तारा दुसऱ्या ताऱ्याहून वेगळा असतो1 करिं 15:41
    वचने
    1 करिं 15:41सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.
  • योसेफाला अकरा तारे नमन करत असल्याचे स्वप्न पडलेउत्प 37:9
    वचने
    उत्प 37:9नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
  • तारे आपल्या कक्षांतून सीसराविरुद्ध लढलेशास्ते 5:20
    वचने
    शास्ते 5:20आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
  • प्रभातीचे तारे मिळून गात होतेईयो 38:7
    वचने
    ईयो 38:7जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
  • ज्ञानी लोकांनी पूर्वेस त्याचा तारा पाहिलामत्त 2:2
    वचने
    मत्त 2:2“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”
  • तारा पुढे जाऊन त्या जागेवर थांबलामत्त 2:9–10
    वचने
    मत्त 2:9–10राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला.
  • दावीदाने वीस वर्षांखालील माणसे मोजली नाहीत: इस्राएल ताऱ्यांसारखा होणार होता1 इति 27:23
    वचने
    1 इति 27:23दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.

नाव घेतलेले तारकापुंज

  • सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडचे तारकापुंजईयो 9:9
    वचने
    ईयो 9:9देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
  • तू कृत्तिकांना बांधू शकतोस काय, किंवा मृगशीर्षाचा पट्टा सोडू शकतोस काय?ईयो 38:31–32
    वचने
    ईयो 38:31–32तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का? तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
  • आमोस: त्याने कृत्तिका आणि मृगशीर्ष निर्माण केलेआमो 5:8
    वचने
    आमो 5:8ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली, तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो; आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो; समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव “परमेश्वर” आहे.

ताऱ्यांची पूजा

  • सूर्य, चंद्र आणि तारे यांना नमन करू नये असे इस्राएलाला सांगितले होतेअनु 4:19
    वचने
    अनु 4:19तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.
  • इस्राएल आणि राजा मनश्शे यांनी आकाशातील सर्व सैन्याला नमन केले2 राजे 17:16, 2 राजे 21:3
    वचने
    2 राजे 17:16आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.
    2 राजे 21:3हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
  • तारकापुंजांना धूप जाळणाऱ्या याजकांना योशीयाने काढून टाकले2 राजे 23:5
    वचने
    2 राजे 23:5यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरूशलेम सभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बआल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.
  • लोक धाब्यांवर आकाशातील सैन्याला नमन करतयिर्म 19:13, सफ 1:5
    वचने
    यिर्म 19:13‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”
    सफ 1:5जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क