आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये रस्ते
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 15 उतारे, ओळीनुसार.
- इस्राएलाने अदोमातून राजरस्त्यानेच जाण्याची परवानगी मागितलीगण 20:17–19
वचने
गण 20:17–19कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू. परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु. इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
- अमोऱ्यांच्या सीहोनाकडेही तीच विनंतीगण 21:22, अनु 2:27
- आश्रयनगरांपर्यंत रस्ते बांधले गेलेअनु 19:3
वचने
अनु 19:3म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर.
- एफ्राथच्या वाटेवर राहेलला पुरलेउत्प 35:19
वचने
उत्प 35:19राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
- यहोशवाने बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने शत्रूचा पाठलाग केलायहो 10:10
वचने
यहो 10:10आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
- शमगाराच्या काळी राजमार्ग सुने पडलेशास्ते 5:6
वचने
शास्ते 5:6अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत.
- शिलो, बेथेलापासून शखेमाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेसशास्ते 21:19
वचने
शास्ते 21:19नंतर ते म्हणाले, “शिलोम छावणीमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.”
- गाईंनी कोश थेट बेथ-शेमेशाच्या रस्त्याने वर नेला1 शमु 6:12
वचने
1 शमु 6:12मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
- पाटाजवळून धोब्याच्या शेताकडे जाणारा रस्तायश 7:3
वचने
यश 7:3मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.
- यरूशलेमेहून यरीहोला खाली जाणारा एक मनुष्य लुटारूंच्या हाती सापडलालूक 10:30–31
वचने
लूक 10:30–31येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले. तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
- बार्तीमय यरीहोतून बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बसलेला होतामार्क 10:46
वचने
मार्क 10:46मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
- अम्माऊस, यरूशलेमेपासून सुमारे सात मैलांवरलूक 24:13
वचने
लूक 24:13त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
- यरूशलेमेहून गज्जाला जाणारा रानातला रस्ताप्रेषि 8:26
वचने
प्रेषि 8:26परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.
- गालीलाला जाताना येशूला शोमरोनातून जावे लागलेयोहा 4:3–5
वचने
योहा 4:3–5तेव्हा तो यहूदीया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला. आणि त्यास शोमरोन प्रांतातून जावे लागले. मग तो शोमरोन प्रांतातील सूखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क