Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › जहाजे आणि समुद्रप्रवास

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये जहाजे आणि समुद्रप्रवास

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 31 उतारे, ओळीनुसार.

  • नोहाचे तारू: गोफेर लाकडाचे, खोल्या असलेले, डांबराने लिंपलेलेउत्प 6:14–15
    वचने
    उत्प 6:14–15तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे.
  • शलमोनाने तांबड्या समुद्राकाठी एसयोन-गेबेर येथे जहाजांचा ताफा बांधला1 राजे 9:26
    वचने
    1 राजे 9:26एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
  • हिरामाच्या खलाशांनी ओफीराहून 450 किक्कार सोने आणले2 इति 8:18
    वचने
    2 इति 8:18हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
  • दर तीन वर्षांनी: सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर1 राजे 10:22
    वचने
    1 राजे 10:22समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
  • यहोशाफाटाची जहाजे हाकारण्यापूर्वीच फुटली1 राजे 22:48, 2 इति 20:36–37
    वचने
    1 राजे 22:48राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
    2 इति 20:36–37तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली. पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.
  • यहेज्केल सोरेचे देवदारू, गंधसरू, अल्लोन आणि ताग यांच्या जहाजासारखे चित्र रेखाटतोयहे 27:5–7
    वचने
    यहे 27:5–7त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे. त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या. तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.
  • लव्हाळ्याच्या होड्यांतून निरोपे पाण्यावरून जातयश 18:2
    वचने
    यश 18:2जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,
  • मोठे जहाज अगदी लहान सुकाणूने वळवले जातेयाको 3:4
    वचने
    याको 3:4तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.
  • समुद्रातील जहाजाचा मार्ग: आगूराला अति आश्चर्यकारकनीति 30:18–19
    वचने
    नीति 30:18–19मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,

प्रवास

  • योनाने तार्शीशाला जाणाऱ्या जहाजाचे भाडे दिलेयोना 1:3
    वचने
    योना 1:3परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला.
  • वादळात खलाशांनी माल समुद्रात फेकून दिलायोना 1:4–5
    वचने
    योना 1:4–5परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.
  • त्यांनी जोरात वल्ही मारली, पण त्यांना किनारा गाठता आला नाहीयोना 1:13
    वचने
    योना 1:13तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.
  • येशूने शिमोनाच्या नावेतून लोकसमुदायाला शिकवलेलूक 5:2–3
    वचने
    लूक 5:2–3तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला.
  • वादळात येशू नावेच्या वरामावर उशीवर झोपलामार्क 4:37–38
    वचने
    मार्क 4:37–38तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”
  • शिष्य वाऱ्याविरुद्ध वल्ही ओढताना जेरीस आलेमार्क 6:48
    वचने
    मार्क 6:48मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता.
  • पौलाचे तीन वेळा जहाज फुटले आणि त्याने एक दिवस भर समुद्रात काढला2 करिं 11:25
    वचने
    2 करिं 11:25तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.

पौलाचा रोमकडे प्रवास

  • आशियाच्या किनाऱ्याने जाणारे अद्रमुत्तियाचे जहाजप्रेषि 27:2
    वचने
    प्रेषि 27:2अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
  • उपासाच्या काळानंतर समुद्रप्रवास धोकादायक होताप्रेषि 27:9
    वचने
    प्रेषि 27:9बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला,
  • ईशान्येचे वादळी वारे सुटले; त्यांनी जहाजाखालून दोरखंड आवळलेप्रेषि 27:14, प्रेषि 27:17
    वचने
    प्रेषि 27:14परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले.
    प्रेषि 27:17जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
  • आधी माल, मग जहाजाची सामग्री समुद्रात फेकलीप्रेषि 27:18–19
    वचने
    प्रेषि 27:18–19जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
  • पाण्याची खोली मोजली: पाणी उथळ होत चालले आहेप्रेषि 27:28
    वचने
    प्रेषि 27:28त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.
  • वरामावरून चार नांगर टाकलेप्रेषि 27:29
    वचने
    प्रेषि 27:29ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.
  • खलाशांनी मचव्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; शिपायांनी त्याचे दोर कापलेप्रेषि 27:30, प्रेषि 27:32
    वचने
    प्रेषि 27:30खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
    प्रेषि 27:32यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
  • जहाजावर 276 लोक होतेप्रेषि 27:37
    वचने
    प्रेषि 27:37आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.
  • जहाज हलके करण्यासाठी त्यांनी धान्य समुद्रात टाकलेप्रेषि 27:38
    वचने
    प्रेषि 27:38त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
  • जहाज वाळूत रुतले आणि वराम फुटून गेलेप्रेषि 27:41
    वचने
    प्रेषि 27:41परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
  • सर्व जण किनाऱ्यावर पोहोचले, काही फळ्यांवरप्रेषि 27:44
    वचने
    प्रेषि 27:44बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.
  • जुळ्या भावांचे चिन्ह असलेल्या आलेक्सांद्रियाच्या जहाजातून पुढे रोमलाप्रेषि 28:11
    वचने
    प्रेषि 28:11आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क