Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › तुरुंग आणि साखळ्या

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये तुरुंग आणि साखळ्या

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 45 उतारे, ओळीनुसार.

जुन्या करारात

  • राजाचे कैदी ठेवले जात त्या तुरुंगात योसेफाला टाकलेउत्प 39:20
    वचने
    उत्प 39:20योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.
  • तुरुंगाधिकाऱ्याने सर्व कैदी योसेफाच्या देखरेखीखाली ठेवलेउत्प 39:22
    वचने
    उत्प 39:22त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता.
  • फारोचा प्यालेबरदार आणि भटारी त्याच तुरुंगात होतेउत्प 40:3
    वचने
    उत्प 40:3आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.
  • योसेफाला अंधारकोठडीतून आणले, त्याची हजामत केली आणि त्याने कपडे बदललेउत्प 41:14
    वचने
    उत्प 41:14मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला.
  • योसेफाने आपल्या भावांना तीन दिवस अटकेत ठेवले, मग शिमोनाला बांधून ठेवलेउत्प 42:17, उत्प 42:24
    वचने
    उत्प 42:17मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.
    उत्प 42:24म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले.
  • अहाब: मीखायाला तुरुंगात टाकून भाकर-पाण्यावर ठेवा1 राजे 22:27
    वचने
    1 राजे 22:27आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
  • संतापलेल्या आसाने हनानी द्रष्ट्याला तुरुंगात टाकले2 इति 16:7, 2 इति 16:10
    वचने
    2 इति 16:7यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
    2 इति 16:10द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
  • अश्शूरच्या राजाने राजा होशेला तुरुंगात टाकले2 राजे 17:4
    वचने
    2 राजे 17:4पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.
  • मनश्शेला आकडी घालून आणि पितळी बेड्या ठोकून बाबेलला नेले2 इति 33:10–11
    वचने
    2 इति 33:10–11परमेश्वर मनश्शेशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही. तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.
  • आंधळा केलेल्या सिद्कीयाला पितळी बेड्या घालून बाबेलला नेले2 राजे 25:7, यिर्म 52:11
    वचने
    2 राजे 25:7त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले.
    यिर्म 52:11मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.
  • सदतीस वर्षांनंतर यहोयाखीनाची सुटका झाली आणि तो राजाच्या मेजावर जेवू लागला2 राजे 25:27–29
    वचने
    2 राजे 25:27–29पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनाला तोपर्यंत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले. त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले. अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.

यिर्मया

  • मार खाऊन बन्यामिनाच्या वरच्या वेशीजवळ खोड्यात अडकवलेयिर्म 20:2
    वचने
    यिर्म 20:2म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.
  • योनाथान चिटणीसाच्या घरातील अंधारकोठडीत कैदयिर्म 37:15–16
    वचने
    यिर्म 37:15–16ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते. म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.
  • पहारेकऱ्यांच्या चौकात ठेवले, दररोज एक भाकर देऊनयिर्म 32:2, यिर्म 37:21
    वचने
    यिर्म 32:2त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.
    यिर्म 37:21म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.
  • पाणी नसलेल्या, फक्त चिखल असलेल्या टाकीत दोरांनी खाली सोडलेयिर्म 38:6
    वचने
    यिर्म 38:6मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
  • रामा येथे मनगटांवरील साखळ्यांतून सुटकायिर्म 40:1, यिर्म 40:4
    वचने
    यिर्म 40:1यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.
    यिर्म 40:4पण आता पाहा, मी तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून तुला आज सोडवत आहे. जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले असले तर, ये, आणि मी तुझी काळजी घेईन. पण जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले नसेल तर मग येऊ नको. तुझ्यादृष्टीने जेथे चांगले आणि योग्य आहे तेथे तू जा.

नव्या करारात

  • हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकलेमत्त 14:3
    वचने
    मत्त 14:3हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.
  • तुरुंगातून योहानाने आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवलेमत्त 11:2
    वचने
    मत्त 11:2बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.
  • योहानाचा तुरुंगात शिरच्छेद झालामत्त 14:10
    वचने
    मत्त 14:10आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले.
  • बंड आणि खून यांसाठी बरब्बा तुरुंगात होतालूक 23:19
    वचने
    लूक 23:19बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते.
  • येशू: “मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला”मत्त 25:36
    वचने
    मत्त 25:36मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.
  • संध्याकाळ झाली होती म्हणून पेत्र आणि योहान यांना रात्रभर अटकेत ठेवलेप्रेषि 4:3
    वचने
    प्रेषि 4:3तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
  • कुलूपबंद आणि पहारा असलेल्या तुरुंगातून प्रेषित नाहीसे झाले होतेप्रेषि 5:18–19, प्रेषि 5:23
    वचने
    प्रेषि 5:18–19आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले. परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,
    प्रेषि 5:23“बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही.”
  • कडक पहाऱ्यात पेत्र दोन शिपायांच्या मध्ये साखळ्यांनी बांधलेला झोपला होताप्रेषि 12:4, प्रेषि 12:6
    वचने
    प्रेषि 12:4हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती.
    प्रेषि 12:6पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.
  • साखळ्या गळून पडल्या, आणि लोखंडी दरवाजा आपोआप उघडलाप्रेषि 12:7, प्रेषि 12:10
    वचने
    प्रेषि 12:7तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.
    प्रेषि 12:10पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
  • फिलिप्पैत: आतली कोठडी, पाय खोड्यात अडकवलेलेप्रेषि 16:23–24
    वचने
    प्रेषि 16:23–24मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.
  • मध्यरात्री भूकंपाने दारे उघडली, आणि सर्वांच्या बेड्या सुटल्याप्रेषि 16:25–26
    वचने
    प्रेषि 16:25–26मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
  • यरूशलेमेत पौलाला दोन साखळ्यांनी बांधलेप्रेषि 21:33
    वचने
    प्रेषि 21:33मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
  • फेलिक्सने पौलाला दोन वर्षे तुरुंगात ठेवलेप्रेषि 24:27
    वचने
    प्रेषि 24:27पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.
  • रोममध्ये पौल साखळीने बांधलेला, एका शिपायाच्या पहाऱ्यात राहत असेप्रेषि 28:16, प्रेषि 28:20
    वचने
    प्रेषि 28:16आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.
    प्रेषि 28:20या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.”
  • तो पूर्ण दोन वर्षे स्वतःच्या भाड्याच्या घरात राहिलाप्रेषि 28:30
    वचने
    प्रेषि 28:30पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
  • अनेसिफराला पौलाच्या साखळ्यांची लाज वाटली नाही2 तीम 1:16
    वचने
    2 तीम 1:16अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही.

सोन्याच्या साखळ्या

  • फारोने योसेफाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातलीउत्प 41:42
    वचने
    उत्प 41:42मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
  • बेलशस्सराने दानीएलाच्या गळ्यात सोन्याची साखळी घालवलीदानि 5:29
    वचने
    दानि 5:29तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.
  • गिदोनाने मिद्यान्यांच्या उंटांच्या गळ्यातील साखळ्या घेतल्याशास्ते 8:26
    वचने
    शास्ते 8:26आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्रे यांखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
  • शलमोनाने गाभाऱ्याच्या समोर सोन्याच्या साखळ्या लावल्या1 राजे 6:21
    वचने
    1 राजे 6:21शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क