Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › अस्वले

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये अस्वले

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 7 उतारे, ओळीनुसार.

  • कोकरे पळवणाऱ्या सिंहाला आणि अस्वलाला दावीदाने मारले1 शमु 17:34–37
    वचने
    1 शमु 17:34–37मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले. मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले. तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.” आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”
  • अलीशाची टिंगल करणाऱ्या बेचाळीस मुलांना दोन अस्वलींनी फाडले2 राजे 2:23–24
    वचने
    2 राजे 2:23–24नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.” अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
  • दावीद आणि त्याची माणसे पिले हिरावलेल्या अस्वलीसारखे क्रूर आहेत2 शमु 17:8
    वचने
    2 शमु 17:8तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आता पिल्ले हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वलासारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत.
  • मूर्खतेत असलेल्या मूर्खाला भेटण्यापेक्षा पिले हिरावलेल्या अस्वलीला भेटणे बरेनीति 17:12
    वचने
    नीति 17:12मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी.
  • जुलमी अधिपती चालून येणाऱ्या अस्वलासारखा असतोनीति 28:15
    वचने
    नीति 28:15गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.
  • सिंहापासून पळावे, आणि अस्वलच समोर यावेआमो 5:19
    वचने
    आमो 5:19जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावाला.
  • आम्ही सर्व अस्वलांसारखे गुरगुरतोयश 59:11
    वचने
    यश 59:11आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो, आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क