Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › तास आणि प्रहर

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये तास आणि प्रहर

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 49 उतारे, ओळीनुसार.

  • “संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस”उत्प 1:5
    वचने
    उत्प 1:5देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.
  • येशू: “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत?”योहा 11:9
    वचने
    योहा 11:9येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो;
  • एक दिवसाची वाट: एलीया रानात तितका दूर गेला1 राजे 19:4
    वचने
    1 राजे 19:4तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”
  • शब्बाथ दिवसाची वाट: जैतुनांच्या डोंगरापासून यरूशलेमेपर्यंतप्रेषि 1:12
    वचने
    प्रेषि 1:12मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.
  • तयारीचा दिवस: शब्बाथाच्या आदला दिवसमार्क 15:42, योहा 19:31
    वचने
    मार्क 15:42त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.
    योहा 19:31तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे.
  • शब्बाथापूर्वी संध्याकाळच्या सावल्या पडू लागताच नहेम्याने वेशी बंद केल्यानहे 13:19
    वचने
    नहे 13:19प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.
  • आहाजाच्या जिन्यावर सावली दहा पायऱ्या मागे गेली2 राजे 20:9–11
    वचने
    2 राजे 20:9–11यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.” हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसे नको, ती दहा पावले मागे यावी.” मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.

रात्रीचे प्रहर

  • विलापगीत: “रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर”, प्रहर सुरू होताचविला 2:19
    वचने
    विला 2:19रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.
  • पहारा बदलल्यावर, मधल्या प्रहराच्या सुरुवातीला गिदोन आलाशास्ते 7:19
    वचने
    शास्ते 7:19तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली.
  • पहाटेच्या प्रहरी मिसरी छावणीत गोंधळ उडालानिर्ग 14:24
    वचने
    निर्ग 14:24तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
  • पहाटेच्या प्रहरी शौलाने अम्मोनी छावणीवर हल्ला केला1 शमु 11:11
    वचने
    1 शमु 11:11मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
  • रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चाललामत्त 14:25, मार्क 6:48
    वचने
    मत्त 14:25तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता.
    मार्क 6:48मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता.
  • धनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येऊ शकतोलूक 12:38
    वचने
    लूक 12:38तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.
  • संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवतो तेव्हा, किंवा सकाळीमार्क 13:35
    वचने
    मार्क 13:35म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही.
  • स्तोत्रकर्ता रात्रीच्या प्रहरांत मनन करतोस्तोत्र 63:6, स्तोत्र 119:148
    वचने
    स्तोत्र 63:6मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
    स्तोत्र 119:148तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.

दिवसाचे तास

  • पेत्र: “सकाळचे नऊ वाजले आहेत” — दिवसाचा तिसराच तास!प्रेषि 2:15
    वचने
    प्रेषि 2:15तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत.
  • तिसऱ्या, सहाव्या, नवव्या आणि अकराव्या तासाला मजूर लावलेमत्त 20:3, मत्त 20:5–6
    वचने
    मत्त 20:3सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते.
    मत्त 20:5–6मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
  • संध्याकाळी सर्वांना मजुरी मिळाली, शेवटी लावलेल्यांना आधीमत्त 20:8–9
    वचने
    मत्त 20:8–9संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’ जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली.
  • त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले तेव्हा तिसरा तास होतामार्क 15:25
    वचने
    मार्क 15:25त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.
  • सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत अंधारमत्त 27:45, मार्क 15:33, लूक 23:44
    वचने
    मत्त 27:45मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.
    मार्क 15:33दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
    लूक 23:44त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
  • पिलात: “पाहा, तुमचा राजा!” सुमारे सहावा तास होतायोहा 19:14
    वचने
    योहा 19:14तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
  • अधिकाऱ्याच्या मुलाचा ताप सातव्या तासाला निघून गेलायोहा 4:52
    वचने
    योहा 4:52तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.”
  • सुमारे दहाव्या तासाला दोन शिष्य येशूबरोबर गेलेयोहा 1:39
    वचने
    योहा 1:39तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्यादिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे चार वाजले होते.
  • प्रार्थनेच्या वेळी, नवव्या तासाला, पेत्र आणि योहान मंदिरात गेलेप्रेषि 3:1
    वचने
    प्रेषि 3:1पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.
  • कर्नेल्य नवव्या तासाला प्रार्थना करत होताप्रेषि 10:3, प्रेषि 10:30
    वचने
    प्रेषि 10:3एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”
    प्रेषि 10:30कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.”
  • सुमारे सहाव्या तासाला पेत्र प्रार्थना करायला छपरावर गेलाप्रेषि 10:9
    वचने
    प्रेषि 10:9दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
  • रात्रीच्या तिसऱ्या तासाला शिपाई कैसरीयाला निघालेप्रेषि 23:23
    वचने
    प्रेषि 23:23मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”

सकाळ, दुपार आणि मध्यरात्र

  • दानीएल दिवसातून तीन वेळा, यरूशलेमेकडे खिडक्या उघड्या ठेवून प्रार्थना करत असेदानि 6:10
    वचने
    दानि 6:10या फर्मानावर सही झाली हे दानीएलास जेव्हा माहित झाले, तेव्हा तो आपल्या घरी गेला, त्याच्या खोलीच्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेने उघडत होत्या, तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून तिनवेळा करत असे.
  • एक स्तोत्र: “मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन”स्तोत्र 55:17
    वचने
    स्तोत्र 55:17मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल.
  • दिवसाच्या उन्हात अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होताउत्प 18:1
    वचने
    उत्प 18:1परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता.
  • इसहाक संध्याकाळी शेतात गेलाउत्प 24:63
    वचने
    उत्प 24:63इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले.
  • वल्हांडणाची कोकरे संध्याकाळी कापली जातनिर्ग 12:6
    वचने
    निर्ग 12:6या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे.
  • संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळी एलीयाने प्रार्थना केली1 राजे 18:36
    वचने
    1 राजे 18:36दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
  • नहेम्याची माणसे पहाटेपासून तारे उगवेपर्यंत भाले धरून उभी राहतनहे 4:21
    वचने
    नहे 4:21अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
  • मध्यरात्री शमशोनाने गज्जाच्या वेशीची दारे उखडून नेलीशास्ते 16:3
    वचने
    शास्ते 16:3शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
  • मध्यरात्री बवाजाला जाग आली तेव्हा त्याच्या पायांशी एक स्त्री पडलेली दिसलीरूथ 3:8
    वचने
    रूथ 3:8मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले.
  • सुमारे मध्यरात्री पौल आणि सीला तुरुंगात प्रार्थना करत आणि गीते गात होतेप्रेषि 16:25
    वचने
    प्रेषि 16:25मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
  • पौल मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला, आणि युतुख खिडकीतून पडलाप्रेषि 20:7, प्रेषि 20:9
    वचने
    प्रेषि 20:7मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
    प्रेषि 20:9युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.
  • कोंबडा दुसऱ्यांदा आरवला, आणि पेत्राला आठवण झालीमार्क 14:30, मार्क 14:72
    वचने
    मार्क 14:30मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
    मार्क 14:72आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.
  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे, सूर्योदय होताच, त्या कबरेकडे गेल्यामार्क 16:2
    वचने
    मार्क 16:2आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क