आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये केस आणि दाढ्या
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 36 उतारे, ओळीनुसार.
- तुमच्या डोक्यावरचे केसही सर्व मोजलेले आहेतमत्त 10:30, लूक 12:7
वचने
मत्त 10:30आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
लूक 12:7पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
- तुम्ही एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीमत्त 5:36
वचने
मत्त 5:36आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
- पौल: लांब केस पुरुषाला लज्जास्पद, स्त्रीला गौरवास्पद1 करिं 11:14–15
वचने
1 करिं 11:14–15पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय? परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत.
- वेण्या घालणे हे सौंदर्याचे उगमस्थान नसावे1 तीम 2:9, 1 पेत्र 3:3
वचने
1 तीम 2:9त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
1 पेत्र 3:3तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;
नियमशास्त्रात
- डोक्याच्या कडेचे केस कापू नयेत किंवा दाढीच्या कडा छाटू नयेतलेवी 19:27
वचने
लेवी 19:27आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका.
- याजकांनी डोक्यावर टक्कल करू नये किंवा दाढीच्या कडा मुंडू नयेतलेवी 21:5
वचने
लेवी 21:5याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
- मृतांसाठी कपाळावरचे केस मुंडू नयेतअनु 14:1
वचने
अनु 14:1तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका.
- केस गळलेला मनुष्य तरीही शुद्ध असतोलेवी 13:40–41
वचने
लेवी 13:40–41कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय. त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे.
- नाजीर आपले केस वाढू देत असे आणि नवस पूर्ण झाल्यावर ते जाळत असेगण 6:5, गण 6:18
वचने
गण 6:5त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत.
गण 6:18मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत.
उदाहरणे
- फारोपुढे जाण्यापूर्वी योसेफाने दाढी केलीउत्प 41:14
वचने
उत्प 41:14मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला.
- शमशोनाच्या डोक्याला वस्तरा लागू नये असे होतेशास्ते 13:5, शास्ते 16:17
वचने
शास्ते 13:5पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”
शास्ते 16:17म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.”
- दलीलेने त्याचे डोके मुंडवले; मग त्याचे केस पुन्हा वाढू लागलेशास्ते 16:19, शास्ते 16:22
वचने
शास्ते 16:19मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
शास्ते 16:22तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
- वेड लागल्याचे सोंग करत दावीदाने आपल्या दाढीवर लाळ गळू दिली1 शमु 21:13
वचने
1 शमु 21:13मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
- हानूनाने दावीदाच्या दूतांच्या अर्ध्या दाढ्या मुंडल्या2 शमु 10:4
वचने
2 शमु 10:4तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.
- दावीद: तुमच्या दाढ्या पुन्हा वाढेपर्यंत यरीहोत राहा2 शमु 10:5
वचने
2 शमु 10:5लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जीत झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा मग यरूशलेम येथे या.
- अबशालोमाच्या वार्षिक कापलेल्या केसांचे वजन दोनशे शेकेल भरत असे2 शमु 14:26
वचने
2 शमु 14:26प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत, केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे, ते केस राजाच्या वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत.
- दावीद दूर असताना मफीबोशेथाने आपल्या मिशा कातरल्या नाहीत2 शमु 19:24
वचने
2 शमु 19:24शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत:कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
- यवाबाने चुंबन घेण्याच्या बहाण्याने अमासाची दाढी धरली2 शमु 20:9
वचने
2 शमु 20:9त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले.
- एलीया केसाळ होता आणि कमरेला कातड्याचा पट्टा बांधत असे2 राजे 1:8
वचने
2 राजे 1:8त्यांनी त्यास उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.”
- मुलांनी अलीशाची टिंगल केली: “अरे टकल्या वर जा”2 राजे 2:23
वचने
2 राजे 2:23नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
- अहरोनाची दाढी आणि तिच्यावरून ओघळणारे उत्तम तेलस्तोत्र 133:2
वचने
स्तोत्र 133:2ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
- ईयोबाने दुःखाने आपले डोके मुंडलेईयो 1:20
वचने
ईयो 1:20तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली.
- एज्राने भयचकित होऊन आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस उपटलेएज्रा 9:3
वचने
एज्रा 9:3जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
- दाढ्या मुंडलेले ऐंशी शोक करणारे परमेश्वराच्या घराकडे आलेयिर्म 41:5
वचने
यिर्म 41:5शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
- नबुखद्नेस्सराचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढलेदानि 4:33
वचने
दानि 4:33हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
- एका स्त्रीने आपल्या केसांनी येशूचे पाय पुसलेलूक 7:38, योहा 12:3
वचने
लूक 7:38आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
योहा 12:3तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.
- नवसासाठी पौलाने किंख्रिया येथे आपले डोके मुंडवलेप्रेषि 18:18
वचने
प्रेषि 18:18पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता.
शोकात
- मुंडलेली डोकी आणि छाटलेल्या दाढ्या — शोकाची चिन्हेयश 15:2, यिर्म 48:37, मीखा 1:16
वचने
यश 15:2दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
यिर्म 48:37कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.
मीखा 1:16म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क