आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये जुळे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 8 उतारे, ओळीनुसार.
एसाव आणि याकोब
- रिबकेच्या पोटात जुळी मुले एकमेकांशी झगडतउत्प 25:22
वचने
उत्प 25:22मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.
- एसाव आधी जन्मला, तांबूस आणि अंगभर केसाळउत्प 25:24–25
वचने
उत्प 25:24–25जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती. आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
- याकोब एसावाची टाच धरून बाहेर आलाउत्प 25:26
वचने
उत्प 25:26त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
- जुळी मुले जन्मली तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होताउत्प 25:26
वचने
उत्प 25:26त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
पेरेस आणि जेरह
- तामारेला जुळी झाली; एकाच्या हाताला किरमिजी दोरा बांधलाउत्प 38:27–28
वचने
उत्प 38:27–28तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती. प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”
- पण त्याचा भाऊ आधी बाहेर आला आणि त्याचे नाव पेरेस ठेवलेउत्प 38:29
वचने
उत्प 38:29परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.
- मग हाताला किरमिजी दोरा असलेला जेरह आलाउत्प 38:30
वचने
उत्प 38:30त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले.
आणखी
- पौल समोरच्या बाजूस जुळ्या भावांचे चिन्ह असलेल्या आलेक्सांद्रियाच्या जहाजातून गेलाप्रेषि 28:11
वचने
प्रेषि 28:11आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क