शोधा › विषय › वेड, खरे आणि सोंग
आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये वेड, खरे आणि सोंग
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 22 उतारे, ओळीनुसार.
- नीतिसूत्रे: फसवून “मी विनोद सांगत नव्हतो काय?” म्हणणारा वेड्यासारखा असतोनीति 26:18–19
वचने
नीति 26:18–19जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो, तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय?
गथ येथे दावीद
- शौलापासून पळताना दावीद गथचा राजा आखीश याच्याकडे आला1 शमु 21:10
वचने
1 शमु 21:10त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा आखीश याच्याकडे गेला.
- आखीशाच्या सेवकांनी त्याला ओळखले, आणि दावीद फार घाबरला1 शमु 21:11–12
वचने
1 शमु 21:11–12तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?” दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला.
- त्याने वेडाचे सोंग केले, वेशीच्या दारांवर रेघोट्या ओढल्या, दाढीवर लाळ गळू दिली1 शमु 21:13
वचने
1 शमु 21:13मग त्याच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले आणि तो कवाडाच्या फळ्यांवर रेघा मारू लागला व आपली लाळ आपल्या दाढीवर गाळू लागला.
- आखीश: “माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत” काय?1 शमु 21:14–15
वचने
1 शमु 21:14–15तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे? माझ्याकडे वेडीमाणसे कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले? याने माझ्या घरात यावे काय?”
- स्तोत्र 34 चे शीर्षक त्याची आठवण करून देते: त्याने वेडेपणाचे सोंग केलेस्तोत्र 34:1
वचने
स्तोत्र 34:1दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
इतर
- उदासीच्या आत्म्याने पछाडलेल्या शौलाला दावीदाच्या वीणेने शांती मिळत असे1 शमु 16:14–16, 1 शमु 16:23
वचने
1 शमु 16:14–16मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला. तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे. आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.”
1 शमु 16:23मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”
- नंतर दावीद वाजवत असताना शौलाने त्याच्यावर भाला फेकला1 शमु 18:10–11
वचने
1 शमु 18:10–11मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता. तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
- नबुखद्नेस्सर बैलासारखे गवत खाऊ लागला; त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढलेदानि 4:33
वचने
दानि 4:33हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
- त्याची बुद्धी परत आली, आणि त्याला पुन्हा सिंहासनावर बसवले गेलेदानि 4:34, दानि 4:36
वचने
दानि 4:34या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.
दानि 4:36त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली.
- पहारेकरी: “रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे”, येहूसारखा!2 राजे 9:20
वचने
2 राजे 9:20पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.
- येहूचे सोबती अधिकारी तरुण संदेष्ट्याला “तो वेडा” म्हणतात2 राजे 9:11
वचने
2 राजे 9:11येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.”
- एक पत्र: संदेष्टा बनणाऱ्या प्रत्येक वेड्याला खोड्यात अडकवावेयिर्म 29:26
वचने
यिर्म 29:26परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.
- कबरांमध्ये राहणारा एक मनुष्य साखळ्या तोडत असे आणि दगडांनी स्वतःला घायाळ करत असेमार्क 5:3–5
वचने
मार्क 5:3–5तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे.
- नंतर लोकांनी त्याला कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला पाहिलेमार्क 5:15
वचने
मार्क 5:15ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली.
- येशूचे कुटुंबीय त्याला धरायला निघाले: त्यास वेड लागले आहेमार्क 3:21
वचने
मार्क 3:21त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
- काही जण येशूविषयी म्हणाले: “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे”योहा 10:20
वचने
योहा 10:20त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”
- पेत्र दाराशी आहे असे रुदा सांगते; “तुला वेड लागले आहे!”प्रेषि 12:13–15
वचने
प्रेषि 12:13–15पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली, ती फाटक उघडण्याचेसुद्धा विसरून गेली, ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे.” विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.”
- फेस्त: “पौला, तू वेडा आहेस”; पौल: “मी वेडा नाही”प्रेषि 26:24–25
वचने
प्रेषि 26:24–25पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.” पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.
- पौल: सर्व जण अन्य भाषांत बोलू लागले तर बाहेरचे लोक म्हणतील तुम्हाला वेड लागले आहे1 करिं 14:23
वचने
1 करिं 14:23म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का?
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क