Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › सुगंधी द्रव्ये भरणे आणि दफनाचे मसाले

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये सुगंधी द्रव्ये भरणे आणि दफनाचे मसाले

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 18 उतारे, ओळीनुसार.

  • योसेफाने आपल्या वैद्यांकडून आपले वडील याकोब यांच्या शरीरात सुगंधी द्रव्ये भरवलीउत्प 50:2
    वचने
    उत्प 50:2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले.
  • सुगंधी द्रव्ये भरायला चाळीस दिवस लागले; मिसरी लोकांनी सत्तर दिवस शोक केलाउत्प 50:3
    वचने
    उत्प 50:3त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.
  • योसेफ 110 व्या वर्षी मरण पावला, त्याच्या शरीरात सुगंधी द्रव्ये भरून मिसरात शवपेटीत ठेवलेउत्प 50:26
    वचने
    उत्प 50:26योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले.
  • योसेफाने सांगितल्याप्रमाणे मोशेने योसेफाच्या अस्थी मिसरातून नेल्यानिर्ग 13:19
    वचने
    निर्ग 13:19मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”
  • त्याच्या अस्थी शखेम येथे, याकोबाने विकत घेतलेल्या जमिनीत पुरल्यायहो 24:32
    वचने
    यहो 24:32आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.

मसाले आणि तागाचे कापड

  • राजा आसाला मसाले आणि मिश्र सुगंधी द्रव्ये भरलेल्या तिरडीवर ठेवले2 इति 16:14
    वचने
    2 इति 16:14दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
  • आसाच्या सन्मानार्थ मोठा अग्नी पेटवला गेला; यहोरामासाठी नाही2 इति 16:14, 2 इति 21:19
    वचने
    2 इति 16:14दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.
    2 इति 21:19त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.
  • मार्था: “आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत”योहा 11:39
    वचने
    योहा 11:39येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.”
  • हातपाय तागाच्या पट्ट्यांनी बांधलेला आणि तोंड रुमालाने गुंडाळलेला लाजर बाहेर आलायोहा 11:44
    वचने
    योहा 11:44तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
  • येशू: तिने माझ्या शरीराला दफनासाठी आधीच अभिषेक केला आहेमार्क 14:8, योहा 12:7
    वचने
    मार्क 14:8तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे.
    योहा 12:7यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे.
  • निकदेमाने पुष्कळ गंधरस आणि अगरू आणलायोहा 19:39
    वचने
    योहा 19:39आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला.
  • यहूद्यांच्या दफनाच्या रीतीप्रमाणे येशूचे शरीर मसाल्यांसह तागाच्या कापडात गुंडाळलेयोहा 19:40
    वचने
    योहा 19:40मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले.
  • स्त्रियांनी मसाले आणि सुगंधी तेले तयार केली, मग शब्बाथ दिवशी विसावा घेतलालूक 23:55–56
    वचने
    लूक 23:55–56गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
  • शब्बाथानंतर शरीराला लावण्यासाठी त्यांनी मसाले विकत घेतलेमार्क 16:1
    वचने
    मार्क 16:1शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले.
  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे त्या मसाले घेऊन कबरेकडे आल्यालूक 24:1
    वचने
    लूक 24:1आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले.
  • पेत्राने तागाची वस्त्रे, आणि वेगळा गुंडाळून ठेवलेला डोक्याचा रुमाल पाहिलायोहा 20:6–7
    वचने
    योहा 20:6–7शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला; आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क