आश्चर्यकारक तपशील
बायबलमध्ये भूकंप
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 15 उतारे, ओळीनुसार.
- पृथ्वी हादरणे आणि पर्वत थरथरणे यांविषयी स्तोत्रे बोलतातस्तोत्र 18:7, स्तोत्र 46:2–3, स्तोत्र 104:32
वचने
स्तोत्र 18:7तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता.
स्तोत्र 46:2–3म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
स्तोत्र 104:32तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात.
उदाहरणे
- सीनाय पर्वत संपूर्ण जोराने हादरलानिर्ग 19:18, स्तोत्र 68:8
वचने
निर्ग 19:18परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
स्तोत्र 68:8तेव्हा भूमी कापली; देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
- कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या पायाखालची जमीन दुभंगलीगण 16:31–32
वचने
गण 16:31–32जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
- योनाथानाच्या हल्ल्यानंतर पलिष्ट्यांच्या छावणीत भूमी हादरली1 शमु 14:15
वचने
1 शमु 14:15छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.
- होरेबावर एलीया: वारा, भूकंप, अग्नी, मग मंद शांत आवाज1 राजे 19:11–12
वचने
1 राजे 19:11–12यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता. धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.
- उज्जीयाच्या काळात आमोस भूकंपाच्या दोन वर्षे आधी बोललाआमो 1:1
वचने
आमो 1:1तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.
- उज्जीयाच्या दिवसांत भूकंपामुळे पळालेल्या लोकांची जखऱ्या आठवण करून देतोजख 14:5
वचने
जख 14:5तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोऱ्याकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोंचेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल; पण माझा परमेश्वर, देव तेथे येईल आणि तुमच्याबरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
- येशूच्या मृत्यूच्या वेळी पृथ्वी हादरली आणि खडक फुटलेमत्त 27:51
वचने
मत्त 27:51पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले.
- शताधिपतीने भूकंप पाहिला आणि तो फार घाबरलामत्त 27:54
वचने
मत्त 27:54आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
- कबरेवरून धोंड लोटली गेली तेव्हा मोठा भूकंपमत्त 28:2
वचने
मत्त 28:2त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
- विश्वासणारे प्रार्थना करत होते ती जागा हादरलीप्रेषि 4:31
वचने
प्रेषि 4:31आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
- फिलिप्पैत भूकंपाने तुरुंगाची दारे उघडलीप्रेषि 16:26
वचने
प्रेषि 16:26तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क