निसर्ग
बायबलमध्ये पक्षी
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 38 उतारे, ओळीनुसार.
- पाचव्या दिवशी जलचरांबरोबर पक्षी निर्माण झालेउत्प 1:20–23
वचने
उत्प 1:20–23देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.
- जलप्रलयानंतर पक्षीही अन्न म्हणून दिलेउत्प 9:2–3
वचने
उत्प 9:2–3पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत. प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे.
- इस्राएल कोणताही शुद्ध पक्षी खाऊ शकतोअनु 14:11
वचने
अनु 14:11कोणताही शुद्ध पक्षी खा.
- खाऊ नयेत: गरुड, गिधाडे, कावळा, शहामृग, घुबडे, करकोचा, बगळा, हुदहुद, वटवाघूळलेवी 11:13–19
वचने
लेवी 11:13–19देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर, घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे, पिंगळा, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड, करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
- पक्षी झऱ्यांजवळ घरटी करतात आणि फांद्यांमध्ये गातातस्तोत्र 104:12
वचने
स्तोत्र 104:12नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात.
- करकोचा देवदारूच्या झाडांत आपले घर करतोस्तोत्र 104:17
वचने
स्तोत्र 104:17तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो.
- वसंतात होल्यांचे कूजन ऐकू येतेगीत 2:12
वचने
गीत 2:12भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
- करकोचा, होला, पाकोळी आणि सारस आपल्या स्थलांतराचा काळ पाळतातयिर्म 8:7
वचने
यिर्म 8:7आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
- शहामृगी आपली अंडी जमिनीवर वाळूत उबण्यासाठी सोडतेईयो 39:14–15
वचने
ईयो 39:14–15ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात. आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
- पंख पसरून शहामृगी घोड्याला आणि स्वाराला हसतेईयो 39:18
वचने
ईयो 39:18परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,
- ससाणा दक्षिणेकडे आपले पंख पसरतोईयो 39:26
वचने
ईयो 39:26तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?
- चिमण्या एका पैशाला दोन, किंवा दोन पैशांना पाच विकल्या जातमत्त 10:29, लूक 12:6
वचने
मत्त 10:29दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.
लूक 12:6पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.
- चिमणी आणि पाकोळी मंदिराच्या वेद्यांजवळ घरटी करतातस्तोत्र 84:3
वचने
स्तोत्र 84:3हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.
- पक्षी पेरत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारांत साठवत नाहीतमत्त 6:26
वचने
मत्त 6:26आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही?
- पूर्ण वाढलेल्या मोहरीच्या झाडाच्या फांद्यांत पक्षी घरटी करतातमत्त 13:32
वचने
मत्त 13:32तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.”
- “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत”मत्त 8:20
वचने
मत्त 8:20येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
- सर्व प्रकारचे पक्षी मनुष्याने माणसाळवले आहेतयाको 3:7
वचने
याको 3:7कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत.
- शलमोनाने पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे यांविषयी शिकवले1 राजे 4:33
वचने
1 राजे 4:33निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
कथांमध्ये
- नोहाचे कबूतर ताजे खुडलेले जैतुनाचे पान घेऊन परत आलेउत्प 8:8–12
वचने
उत्प 8:8–12नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले. तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.
- अब्रामाच्या मढ्यांवर शिकारी पक्षी उतरले, आणि त्याने त्यांना हाकलून लावलेउत्प 15:10–11
वचने
उत्प 15:10–11त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत; कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
- संध्याकाळी लावे पक्ष्यांनी छावणी व्यापलीनिर्ग 16:13
वचने
निर्ग 16:13त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे पक्षी येऊन छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दव पडले.
- समुद्राकडून आलेले लावे; कोणीही दहा होमरपेक्षा कमी गोळा केले नाहीतगण 11:31–32
वचने
गण 11:31–32मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता. लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
- शलमोनाच्या मेजासाठी पुष्ट कोंबड्या; नहेम्याच्या मेजासाठी रोज पक्षी1 राजे 4:23, नहे 5:18
वचने
1 राजे 4:23दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
नहे 5:18आता प्रत्येक दिवशी एक बैल, सहा निवडक मेंढरे आणि पक्षीही तयार करीत असत, व प्रत्येक दहा दिवसानी सर्व प्रकारचे द्राक्षरस मुबलक प्रमाणात आणत आणि तरीही, मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता.
- पेत्राने येशूला नाकारले तेव्हा कोंबडा आरवलामत्त 26:74–75
वचने
मत्त 26:74–75मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
नियमशास्त्रात
- घरट्यातून पिले घ्या, पण आई पक्ष्याला जाऊ द्याअनु 22:6–7
वचने
अनु 22:6–7वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.
- त्वचारोगातून शुद्धीकरण: दोन पक्षी, एक मोकळ्या रानात सोडला जातोलेवी 14:4–7
वचने
लेवी 14:4–7तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी; आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे.
- बाळ येशूसाठी: होल्यांची जोडी किंवा पारव्याची दोन पिलेलूक 2:22, लूक 2:24
वचने
लूक 2:22पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.
लूक 2:24आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
पाशांविषयी वचने
- पक्षी पाहत असताना “त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे”नीति 1:17
वचने
नीति 1:17एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे.
- “जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय?”आमो 3:5
वचने
आमो 3:5जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय? पाशांत काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय?
- “पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे”स्तोत्र 124:7
वचने
स्तोत्र 124:7पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
- पाशात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणेउप 9:12
वचने
उप 9:12कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.
इतर वचने
- “जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो”नीति 27:8
वचने
नीति 27:8जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.
- “पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी” कपटाने भरलेली घरेयिर्म 5:27
वचने
यिर्म 5:27पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.
- “धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे”स्तोत्र 102:7
वचने
स्तोत्र 102:7मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
- “मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले”यश 38:14
वचने
यश 38:14मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले; माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत. माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.”
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क