निसर्ग
बायबलमध्ये गरुड
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 20 उतारे, ओळीनुसार.
- इस्राएलाने खाऊ नयेत अशा पक्ष्यांपैकी गरुड एक आहेलेवी 11:13, अनु 14:12
वचने
लेवी 11:13देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
अनु 14:12पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या,
- गरुड कड्यावर उंच, खडकाच्या टोकावर घरटे करतोईयो 39:27–28
वचने
ईयो 39:27–28आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का? तो उंच सुळक्यावर राहतो तीच त्याची तटबंदी आहे
- तेथून तो अन्न टेहळतो; त्याचे डोळे दुरून ते पाहतातईयो 39:29
वचने
ईयो 39:29त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
- त्याची पिले रक्त पितात; जेथे मारलेले असतात तेथे तो असतोईयो 39:30
वचने
ईयो 39:30जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.”
- गरुड आपले घरटे हलवतो आणि आपल्या पिलांवर घिरट्या घालतोअनु 32:11
वचने
अनु 32:11इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.
- गरुड आपल्या भक्ष्यावर झडप घालतोईयो 9:26, यिर्म 49:22
वचने
ईयो 9:26लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
यिर्म 49:22पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
- “आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग” — अति आश्चर्यकारक चार गोष्टींपैकी एकनीति 30:18–19
वचने
नीति 30:18–19मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,
वचने
- गरुडांहून वेगवान: शौल आणि योनाथान, पाठलाग करणारे, घोडे2 शमु 1:23, विला 4:19, यिर्म 4:13
वचने
2 शमु 1:23शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
विला 4:19आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.
यिर्म 4:13पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.
- सीनाय येथे: “तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले”निर्ग 19:4
वचने
निर्ग 19:4मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
- दुरून येणारे, गरुडासारखे झडप घालणारे एक राष्ट्रअनु 28:49
वचने
अनु 28:49दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
- शोकात: “गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा”मीखा 1:16
वचने
मीखा 1:16म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.
- संपत्ती “पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील”नीति 23:5
वचने
नीति 23:5जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
- “तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते”स्तोत्र 103:5
वचने
स्तोत्र 103:5तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
- “ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील”यश 40:31
वचने
यश 40:31पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.
- “जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस”यिर्म 49:16, ओब 1:4
वचने
यिर्म 49:16जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसविले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस तरी तेथून मी तुला खाली आणीन. असे परमेश्वराचे म्हणणे आहे.
ओब 1:4परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क