शोधा › विषय › उन्हाळा आणि हिवाळा
निसर्ग
बायबलमध्ये उन्हाळा आणि हिवाळा
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 40 उतारे, ओळीनुसार.
- पेरणी आणि कापणी, थंडी आणि उष्णता, उन्हाळा आणि हिवाळा कधीही थांबणार नाहीतउत्प 8:22
वचने
उत्प 8:22जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”
- ऋतू, दिवस आणि वर्षे ठरवण्यासाठी आकाशातील ज्योतीउत्प 1:14, स्तोत्र 104:19
वचने
उत्प 1:14मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
स्तोत्र 104:19त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.
- एक स्तोत्र: “तू उन्हाळा आणि हिवाळा केलास”स्तोत्र 74:17
वचने
स्तोत्र 74:17तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत; तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.
- ऋतूप्रमाणे पाऊस: आगोटीचा आणि वळवाचा पाऊसअनु 11:14, योए 2:23, यिर्म 5:24
वचने
अनु 11:14तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल.
योए 2:23म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
यिर्म 5:24यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.
- वसंतात, जेव्हा राजे युद्धाला निघतात2 शमु 11:1
वचने
2 शमु 11:1वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
- द्राक्षांच्या हंगामापर्यंत मळणी, आणि पेरणीपर्यंत द्राक्षांचा हंगामलेवी 26:5
वचने
लेवी 26:5तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल.
- जवाच्या कापणीच्या सुरुवातीला रूथ आली आणि गव्हाची कापणी होईपर्यंत तिने सरवा वेचलारूथ 1:22, रूथ 2:23
- गव्हाच्या कापणीच्या वेळी शमुवेलाने मेघगर्जना आणि पाऊस मागितला1 शमु 12:17–18
वचने
1 शमु 12:17–18आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वरास मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.” तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
- याकोबाची वर्षे: दिवसा ऊन आणि रात्री दहिवरउत्प 31:40
वचने
उत्प 31:40दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.
उन्हाळा
- एग्लोन आपल्या माडीच्या गारव्यात बसला होताशास्ते 3:20, शास्ते 3:24
वचने
शास्ते 3:20एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला.
शास्ते 3:24तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.”
- हिवाळी घरे आणि उन्हाळी घरेआमो 3:15
वचने
आमो 3:15हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
- सीबाने दावीदासाठी उन्हाळी फळांच्या शंभर ढेपा आणल्या2 शमु 16:1–2
वचने
2 शमु 16:1–2डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षरस आहे.”
- गदल्या: द्राक्षारस, उन्हाळी फळे आणि तेल गोळा करून भांड्यांत साठवायिर्म 40:10, यिर्म 40:12
वचने
यिर्म 40:10आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.
यिर्म 40:12तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.
- मुंगी उन्हाळ्यात आपले अन्न साठवतेनीति 6:6–8, नीति 30:25
वचने
नीति 6:6–8अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही. तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
नीति 30:25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
- उन्हाळ्यात खळ्यावरचा भुसा, वाऱ्याने उडवून नेलेलादानि 2:35
वचने
दानि 2:35त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यातील खेळ्यातल्या भुश्याप्रमाणे झाले. वारा त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळयावर आदळला होता त्यांचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
- अंजिराच्या झाडाला पाने फुटतात तेव्हा उन्हाळा जवळ असतोमत्त 24:32
वचने
मत्त 24:32अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते.
- “उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे”स्तोत्र 32:4
वचने
स्तोत्र 32:4कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
हिवाळा
- “बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला”गीत 2:11–13
वचने
गीत 2:11–13बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला. भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे. अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
- नवव्या महिन्यात राजा आपल्या हिवाळी महालात शेगडीजवळ बसला होतायिर्म 36:22
वचने
यिर्म 36:22आता तो नवव्या महिना होता म्हणून राजा हिवाळ्याच्या घरात बसला होता आणि त्याच्यासमोर शेगडी पेटलेली होती.
- पावसाळ्यात लोक मुसळधार पावसात चौकात थरथरत बसलेएज्रा 10:9, एज्रा 10:13
वचने
एज्रा 10:9त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसाच्या आत यरूशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पाऊसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.
एज्रा 10:13पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.
- हिवाळ्यात पुनःस्थापनेचा सण; येशू शलमोनाच्या देवडीत फिरत होतायोहा 10:22–23
वचने
योहा 10:22–23तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता. आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता.
- पळ काढावा लागेल तेव्हा “थंडीचे दिवस” नसावेत म्हणून प्रार्थना करामत्त 24:20
वचने
मत्त 24:20जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
- उपासाच्या काळानंतर समुद्रप्रवास धोकादायक झाला; त्यांनी हिवाळा काढण्यासाठी बंदर शोधलेप्रेषि 27:9, प्रेषि 27:12
वचने
प्रेषि 27:9बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला,
प्रेषि 27:12परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले.
- आलेक्सांद्रियाचे एक जहाज त्या बेटावर हिवाळाभर राहिले होतेप्रेषि 28:11
वचने
प्रेषि 28:11आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते.
- पौलाने निकापलीस येथे हिवाळा काढायचे ठरवलेतीत 3:12
वचने
तीत 3:12मी अंर्तमाला किंवा तुखिकला तुझ्याकडे धाडून दिल्यावर, तू माझ्याकडे निकापलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर कारण मी तेथे हिवाळा घालविण्याचे ठरवले आहे.
- पौल तीमथ्याला: “तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर”2 तीम 4:21
वचने
2 तीम 4:21तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात.
- लोकरीसारखे पसरलेले हिम, राखेसारखे विखुरलेले दहिवरस्तोत्र 147:16
वचने
स्तोत्र 147:16तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
नीतिसूत्रांतील वचने
- “उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे”नीति 10:5
वचने
नीति 10:5उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.
- “उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस”नीति 26:1
वचने
नीति 26:1उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.
- “कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय”नीति 25:13
वचने
नीति 25:13कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
- आळशी योग्य वेळी नांगरत नाहीनीति 20:4
वचने
नीति 20:4आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क