निसर्ग
बायबलमध्ये समुद्र
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 32 उतारे, ओळीनुसार.
- एकत्र झालेल्या पाण्याला “समुद्र” असे म्हटलेउत्प 1:9–10
वचने
उत्प 1:9–10नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.
- मोठे जलचर पाचव्या दिवशी निर्माण झालेउत्प 1:21–23
वचने
उत्प 1:21–23समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.
- विशाल आणि विस्तीर्ण समुद्र, प्राण्यांनी गजबजलेला, जेथे जहाजे चालतातस्तोत्र 104:25–26
वचने
स्तोत्र 104:25–26त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत. तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
- सर्व नद्या समुद्राला मिळतात, तरी समुद्र कधी भरत नाहीउप 1:7
वचने
उप 1:7सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात पण सागर कधीही भरून जात नाही. ज्या स्थानाकडून नद्या वाहत येतात, तेथेच त्या पुन्हा जातात.
- वाळू ही अशी सीमा आहे जी लाटा ओलांडू शकत नाहीतयिर्म 5:22, ईयो 38:8–11
वचने
यिर्म 5:22परमेश्वर म्हणतो, तुम्ही भीत नाही काय? किंवा माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापत नाही काय? मी सनातन नियमाने समुद्राच्याविरूद्ध वाळूची सीमा घातली आहे, जेणेकरून त्याने उल्लंघन करू नये. जरी समुद्र उठतो आणि खाली पडतो, तरी त्याच्याने उल्लंघवत नाही. जरी त्याच्या लाटा गर्जतात, तरी त्या ओलांडून जात नाही.
ईयो 38:8–11जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.
- लाटांवरील खलाशी आकाशापर्यंत चढतात आणि खोल डोहात उतरतातस्तोत्र 107:23–27
वचने
स्तोत्र 107:23–27काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात. ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात. कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो. लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते. ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
देशाचे समुद्र
- महासमुद्र पश्चिम सीमा होतागण 34:6, यहो 1:4
- क्षार समुद्र, जेथे पूर्वी सिद्दीम खोरे होतेउत्प 14:3
वचने
उत्प 14:3नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.
- इस्राएल पार जात असताना क्षार समुद्राकडे जाणारा यार्देनेचा प्रवाह थांबलायहो 3:16
वचने
यहो 3:16तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
- तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत सीमानिर्ग 23:31
वचने
निर्ग 23:31“मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.
- शलमोनाने तांबड्या समुद्राच्या काठी एसयोन-गेबेर येथे जहाजांचा ताफा बांधला1 राजे 9:26
वचने
1 राजे 9:26एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
- पेत्र आणि अंद्रिया गालील समुद्रात जाळी टाकत होतेमत्त 4:18
वचने
मत्त 4:18नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
कथांमध्ये
- पूर्वेच्या वाऱ्याने समुद्र मागे हटवला; इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार गेलानिर्ग 14:21–22
वचने
निर्ग 14:21–22मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले.
- पहाट होताच समुद्र परत आला आणि त्याने फारोचे रथ झाकलेनिर्ग 14:27–28
वचने
निर्ग 14:27–28मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही.
- जहाज हलके करण्यासाठी योनाच्या खलाशांनी माल समुद्रात फेकलायोना 1:4–5
वचने
योना 1:4–5परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले. तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.
- योनाला टाकून दिल्यावर खवळलेला समुद्र शांत झालायोना 1:15
वचने
योना 1:15नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला.
- एका मोठ्या माशाने योनाला गिळलेयोना 1:17
वचने
योना 1:17मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.
- लाटा नावेवर आदळत असताना येशू वरामावर उशीवर झोपला होतामार्क 4:37–39
वचने
मार्क 4:37–39तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?” मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
- रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चाललामत्त 14:25–26
वचने
मत्त 14:25–26तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले
- पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चाललामत्त 14:28–29
वचने
मत्त 14:28–29पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
- पहिल्याने धरलेल्या माशाच्या तोंडात नाणेमत्त 17:27
वचने
मत्त 17:27तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”
- 153 मोठे मासे, आणि जाळे फाटले नाहीयोहा 21:11
वचने
योहा 21:11तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
- सुमारे दोन हजार डुकरे कड्यावरून धावत समुद्रात गेलीमार्क 5:13
वचने
मार्क 5:13मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला.
- अद्रिया समुद्रात खोली मोजली: पाणी उथळ होत चालले आहेप्रेषि 27:27–28
वचने
प्रेषि 27:27–28चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला. त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.
मंदिरातील गंगाळसागर
- शलमोनाचा ओतीव धातूचा गंगाळसागर: एक प्रचंड गोल पात्र1 राजे 7:23
वचने
1 राजे 7:23मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे.
- तो बारा बैलांवर उभा होता, प्रत्येक दिशेकडे तीन तोंड करून1 राजे 7:25
वचने
1 राजे 7:25बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती.
वचने
- वंशज “समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके”उत्प 22:17, उत्प 32:12
वचने
उत्प 22:17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.
उत्प 32:12परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’”
- शलमोनाला “समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले”1 राजे 4:29
वचने
1 राजे 4:29देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले.
- वादळाने खवळलेला समुद्र शांत राहू शकत नाही; त्याच्या लाटा चिखल ढवळतातयश 57:20
वचने
यश 57:20पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क