निसर्ग
बायबलमध्ये वारे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 32 उतारे, ओळीनुसार.
पूर्वेचा वारा
- फारोचे स्वप्न: पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली कणसेउत्प 41:6, उत्प 41:23
वचने
उत्प 41:6त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.
उत्प 41:23मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली.
- पूर्वेचा वारा एक दिवस आणि एक रात्र वाहिला आणि त्याने टोळ आणलेनिर्ग 10:13
वचने
निर्ग 10:13मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
- पूर्वेच्या जोरदार वाऱ्याने रात्रभर समुद्र मागे हटवलानिर्ग 14:21
वचने
निर्ग 14:21मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.
- पूर्वेच्या कडक वाऱ्याने आणि उन्हाने योना मूर्च्छित झालायोना 4:8
वचने
योना 4:8मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.”
- पूर्वेचा वारा समुद्रातील जहाजे फोडून टाकतोस्तोत्र 48:7, यहे 27:26
वचने
स्तोत्र 48:7पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
यहे 27:26तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.
इतर वारे
- पश्चिमेच्या अतिशय जोरदार वाऱ्याने टोळ तांबड्या समुद्रात नेलेनिर्ग 10:19
वचने
निर्ग 10:19तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
- “उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो”नीति 25:23
वचने
नीति 25:23उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.
- उत्तरेच्या सोसाट्याच्या वाऱ्यांनी थंडी येतेईयो 37:9
वचने
ईयो 37:9दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात.
- दक्षिणेच्या वाऱ्याखाली भूमी शांत असते तेव्हा कपडे गरम होतातईयो 37:17
वचने
ईयो 37:17तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.
- “जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल”लूक 12:55
वचने
लूक 12:55जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते.
- वारा आकाश स्वच्छ करून गेल्यावर कोणी सूर्याकडे पाहू शकत नाहीईयो 37:21
वचने
ईयो 37:21आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.
कथांमध्ये
- पृथ्वीवरून वारा वाहिला, आणि प्रलयाचे पाणी ओसरू लागलेउत्प 8:1
वचने
उत्प 8:1देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.
- वाऱ्याने समुद्राकडून लावे आणलेगण 11:31
वचने
गण 11:31मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता.
- वाळवंटातून आलेल्या वाऱ्याने ईयोबाच्या मुलांच्या घराचे चारही कोपरे धडकलेईयो 1:18–19
वचने
ईयो 1:18–19आत्तापर्यंत तो हे सांगत असतांनाच, आणखी एक आला आणि म्हणाला, “तुझी मुले आणि मुली त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात खात होते व द्राक्षरस पीत होते. तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.”
- होरेबावर एका प्रचंड वाऱ्याने खडक फोडले, मग भूकंप झाला1 राजे 19:11
वचने
1 राजे 19:11यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
- समुद्रावरच्या प्रचंड वाऱ्याने योनाचे जहाज फुटायला आलेयोना 1:4
वचने
योना 1:4परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले.
- येशूने वाऱ्याला आणि समुद्राला धमकावले, आणि अगदी निवांत झालेमत्त 8:24–27
वचने
मत्त 8:24–27तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
- वारा उलटा असल्यामुळे शिष्य वल्ही ओढताना जेरीस आलेमार्क 6:48, मत्त 14:24, योहा 6:18
वचने
मार्क 6:48मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता.
मत्त 14:24पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते.
योहा 6:18आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते.
- दक्षिणेचा मंद वारा, मग ‘ईशान्येचे’ म्हटलेले वादळी वारेप्रेषि 27:13–15
वचने
प्रेषि 27:13–15तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले. आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
- दक्षिणेच्या वाऱ्यामुळे पौलाचे जहाज दोन दिवसांत रेगियोनाहून पुत्युलास पोहोचलेप्रेषि 28:13
वचने
प्रेषि 28:13तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो.
वचने
- “वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो”उप 1:6
वचने
उप 1:6वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो, नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून आणि पुन्हा माघारी येतो.
- “जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही”उप 11:4
वचने
उप 11:4जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही. जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही.
- “जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही”उप 11:5
वचने
उप 11:5जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही, आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.
- “वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता”योहा 3:8
वचने
योहा 3:8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
- वाऱ्याने उडवून नेलेल्या भुशासारखेस्तोत्र 1:4
वचने
स्तोत्र 1:4परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
- “वाऱ्याने हलविलेला बोरू काय?”मत्त 11:7
वचने
मत्त 11:7मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
- जोरदार वाऱ्याने लोटलेली मोठी जहाजे लहान सुकाणूने वळवली जातातयाको 3:4
वचने
याको 3:4तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्याने लोटली जातात, पण ती चालवणार्या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.
- “वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा”याको 1:6
वचने
याको 1:6पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क