Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › लबानोनाचे गंधसरू

निसर्ग

बायबलमध्ये लबानोनाचे गंधसरू

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 32 उतारे, ओळीनुसार.

  • लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतील एजोबापर्यंत शलमोन झाडांविषयी बोलला1 राजे 4:33
    वचने
    1 राजे 4:33निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
  • एक स्तोत्र: लबानोनाचे गंधसरू तृप्त आहेतस्तोत्र 104:16
    वचने
    स्तोत्र 104:16परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत;
  • शलमोनाच्या काळात तळवटीतील उंबरांइतके गंधसरू विपुल होते1 राजे 10:27, 2 इति 1:15
    वचने
    1 राजे 10:27राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरूशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
    2 इति 1:15राजाने यरूशलेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की, ते दगडांप्रमाणे विपुल झाले तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले.
  • लोक तोडलेल्या उंबरांच्या जागी गंधसरू लावणार होतेयश 9:10
    वचने
    यश 9:10“विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
  • लबानोनातील गंधसरूपासून सोरेसाठी जहाजाची डोलकाठी केलीयहे 27:5
    वचने
    यहे 27:5त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे.
  • शुद्धीकरणाच्या विधीत गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी सूत वापरले जाईलेवी 14:4, गण 19:6
    वचने
    लेवी 14:4तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे.
    गण 19:6नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या.

गंधसरूने बांधकाम

  • सोरेचा हिराम याने दावीदाच्या महालासाठी गंधसरूचे ओंडके, सुतार आणि गवंडी पाठवले2 शमु 5:11
    वचने
    2 शमु 5:11सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
  • दावीद: “मी गंधसरूच्या घरात राहत आहे”, पण कोश “एका तंबूतच राहत आहे”1 इति 17:1
    वचने
    1 इति 17:1आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.”
  • शलमोनाने हिरामाकडे गंधसरू मागितले; सीदोनी लोकांसारखे लाकूड तोडणारे कोणी नव्हते1 राजे 5:6
    वचने
    1 राजे 5:6तर आता माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. तुम्हास माहित आहे की आमचे लोक तुमच्या सीदोनी लोकांइतके कुशल नाहीत.”
  • ओंडके समुद्रापर्यंत ओढून नेले आणि तराफे करून तरंगवत नेले1 राजे 5:8–9, 2 इति 2:16
    वचने
    1 राजे 5:8–9मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या ईच्छेप्रमाणे देईन. माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.”
    2 इति 2:16लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”
  • हिरामाच्या लाकूडतोड्यांना गहू, जव, द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल देऊन मोबदला दिला2 इति 2:10
    वचने
    2 इति 2:10लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.”
  • 30,000 इस्राएली महिन्या-महिन्याच्या 10,000 च्या पाळ्यांनी लबानोनात काम करत1 राजे 5:13–14
    वचने
    1 राजे 5:13–14शलमोन राजाने सर्व इस्राएल लोंकावर वेठबिगार बसवला यासाठी तीस हजार माणसे नेमली. अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
  • गंधसरू आणि देवदारू यांच्या बदल्यात शलमोनाने हिरामाला गालीलातील वीस नगरे दिली1 राजे 9:11
    वचने
    1 राजे 9:11त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
  • मंदिराचे छत गंधसरूच्या तुळ्या आणि फळ्यांनी केले1 राजे 6:9–10
    वचने
    1 राजे 6:9–10शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता. मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
  • आत गंधसरूवर रानकाकड्या आणि फुले कोरली होती; एकही दगड दिसत नव्हता1 राजे 6:15, 1 राजे 6:18
    वचने
    1 राजे 6:15मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
    1 राजे 6:18हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
  • आतले अंगण: घडीव दगडांच्या तीन रांगा आणि गंधसरूच्या तुळ्यांची एक रांग1 राजे 6:36
    वचने
    1 राजे 6:36मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
  • लबानोनगृह वन गंधसरूच्या खांबांच्या चार रांगांवर उभे होते1 राजे 7:2–3
    वचने
    1 राजे 7:2–3त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या. त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या.
  • परत आलेल्या बंदिवानांनी लबानोनाहून यापोपर्यंत गंधसरूचे ओंडके जहाजांनी आणलेएज्रा 3:7
    वचने
    एज्रा 3:7त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांस अन्न, पेय व तेलही दिले.
  • एक राजा आपल्या महालाला गंधसरूचे तक्तपोशी करतो आणि शेंदरी रंग देतोयिर्म 22:14
    वचने
    यिर्म 22:14जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.” जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!
  • “आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत”गीत 1:17
    वचने
    गीत 1:17आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.

वचने आणि बोधकथा

  • योवाशाची बोधकथा: एक काटेरी झुडूप गंधसरूकडे त्याची मुलगी मागते2 राजे 14:9
    वचने
    2 राजे 14:9तेव्हा इस्राएलाचा राजा योवाशाने यहूदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, “लबानोनातल्या काटेरी झुडुपाने लबानोनातल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी करून दे.” पण लबानोनातल्या एका वन्यपशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून टाकले.
  • योथामाची बोधकथा: काटेरी झुडपातून निघालेला अग्नी गंधसरूंना भस्म करतोशास्ते 9:15
    वचने
    शास्ते 9:15तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’
  • गंधसरूंसारखा उंच आणि अल्लोन वृक्षांसारखा बलवान अमोरीआमो 2:9
    वचने
    आमो 2:9मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला, ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती; ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
  • एक स्तोत्र: “तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल”स्तोत्र 92:12
    वचने
    स्तोत्र 92:12नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
  • “परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते”स्तोत्र 29:5
    वचने
    स्तोत्र 29:5परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
  • “ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे”गीत 5:15
    वचने
    गीत 5:15त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
  • गंधसरू आनंद करतात: “लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही”यश 14:8
    वचने
    यश 14:8लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’
  • “गंधसरू उन्मळून पडला आहे म्हणून हे देवदार वृक्षांनो आक्रोश करा”जख 11:2
    वचने
    जख 11:2गंधसरू उन्मळून पडला आहे म्हणून हे देवदार वृक्षांनो आक्रोश करा. जे श्रेष्ठ होते ते नाश झाले आहे! बाशानाच्या ओक वृक्षांनो, विलाप करा कारण घनदाट अरण्य भूसपाट झाले आहे.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क