निसर्ग
बायबलमध्ये पर्वत
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 41 उतारे, ओळीनुसार.
- “रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात”स्तोत्र 104:18
वचने
स्तोत्र 104:18रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
- यरूशलेमेभोवती पर्वत आहेतस्तोत्र 125:2
वचने
स्तोत्र 125:2यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.
- ज्या देशाच्या डोंगरांतून तांबे खणता येतेअनु 8:9
वचने
अनु 8:9येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
- खाणकामगार चकमकीवर घाव घालतो आणि पर्वत मुळापासून उलथून टाकतोईयो 28:9
वचने
ईयो 28:9मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो.
- पर्वत झिजतो आणि ढासळतोईयो 14:18
वचने
ईयो 14:18डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.
- लबानोनाची शिखरे: अमाना, सनीर, हर्मोन, सिंहांच्या गुहा आणि चित्त्यांचे पर्वतगीत 4:8
वचने
गीत 4:8लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
- शलमोनाकडे पर्वतांत 80,000 पाथरवट होते1 राजे 5:15
वचने
1 राजे 5:15ऐंशी हजार लोकांस शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.
- मिद्यानाविरुद्ध इस्राएलाने पर्वतांत आणि गुहांत आश्रयस्थाने केलीशास्ते 6:2
वचने
शास्ते 6:2तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
- उघड्या डोंगरमाथ्यावर उभारलेले निशाण ही खूण होतीयश 13:2, यश 18:3
वचने
यश 13:2उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.
यश 18:3अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.
- “यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे”मत्त 24:16
वचने
मत्त 24:16त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
- सावली देणाऱ्या झाडांखाली डोंगरमाथ्यावरील पूजास्थानेहोशे 4:13, अनु 12:2
वचने
होशे 4:13ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.
अनु 12:2आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.
कथांमधील पर्वत
- तारू अरारात पर्वतांवर स्थिरावलेउत्प 8:4
वचने
उत्प 8:4सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले.
- दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागलीउत्प 8:5
वचने
उत्प 8:5दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले.
- अब्राहामाला मोरिया देशातील एका पर्वतावर पाठवलेउत्प 22:2
वचने
उत्प 22:2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”
- मोशे कळप घेऊन देवाचा पर्वत होरेब येथे आलानिर्ग 3:1
वचने
निर्ग 3:1तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
- लोकांनी सीनाय पर्वताला स्पर्श करू नये म्हणून सीमा घातलीनिर्ग 19:12
वचने
निर्ग 19:12परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल.
- सीनाय भट्टीसारखा धुमसत होता आणि जोराने हादरत होतानिर्ग 19:18
वचने
निर्ग 19:18परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
- मोशे पर्वतावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्री राहिलानिर्ग 24:18
वचने
निर्ग 24:18मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
- अहरोन होर पर्वताच्या शिखरावर मरण पावलागण 20:27–28
वचने
गण 20:27–28मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
- पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो शिखरावरून मोशेने देश पाहिलाअनु 34:1
वचने
अनु 34:1मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व गिलाद प्रदेश,
- सहा वंश गरिज्जीम डोंगरावर आणि सहा एबाल डोंगरावर उभे राहिलेअनु 27:12–13
वचने
अनु 27:12–13ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन या गोत्रांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे रहावे. तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.
- योथामाने गरिज्जीम डोंगराच्या शिखरावरून आपली बोधकथा पुकारलीशास्ते 9:7
वचने
शास्ते 9:7नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. “त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.
- बाराकाने ताबोर डोंगराजवळ दहा हजार पुरुष जमवलेशास्ते 4:6
वचने
शास्ते 4:6तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.
- शौल आणि दावीद एकाच डोंगराच्या दोन बाजूंना1 शमु 23:26
वचने
1 शमु 23:26शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.
- शौल आणि त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडले1 शमु 31:8
वचने
1 शमु 31:8दुसऱ्या दिवशी असे झाले की, पलिष्टी मेलेल्यांची वस्त्रे लुटायला आले तेव्हा त्यांना शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले सापडले.
- एलीयाने इस्राएलाला आणि बआलाच्या संदेष्ट्यांना कर्मेल पर्वतावर जमवले1 राजे 18:19–20
वचने
1 राजे 18:19–20तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.” तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
- कर्मेलाच्या शिखरावर एलीयाने आपले तोंड गुडघ्यांमध्ये घातले1 राजे 18:42
वचने
1 राजे 18:42तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.
- शोमरोनी स्त्री: “आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली”योहा 4:20
वचने
योहा 4:20आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.”
- येशू डोंगरावर चढला आणि शिकवायला बसलामत्त 5:1
वचने
मत्त 5:1जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
- प्रार्थना करायला येशू एकटाच डोंगरावर गेलामत्त 14:23, लूक 6:12
वचने
मत्त 14:23लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
लूक 6:12त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.
- उंच डोंगरावर येशूचे रूपांतर झालेमत्त 17:1–2
वचने
मत्त 17:1–2मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.
- नासरेथ एका टेकडीवर वसले होते, तिच्या कडेला कडा होतालूक 4:29
वचने
लूक 4:29ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
- येशू आपल्या संध्याकाळी जैतुनांच्या डोंगरावर घालवत असेलूक 21:37
वचने
लूक 21:37प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
- जैतुनांचा डोंगर: यरूशलेमेपासून शब्बाथ दिवसाच्या वाटेइतकाप्रेषि 1:12
वचने
प्रेषि 1:12मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.
वचने
- “जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल”यिर्म 46:18
वचने
यिर्म 46:18ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे तसा कोणीएक येईल.
- हा डोंगर हलायला सांगू शकेल असा विश्वासमत्त 17:20, मत्त 21:21
वचने
मत्त 17:20तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
मत्त 21:21येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
- “मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो”स्तोत्र 121:1
वचने
स्तोत्र 121:1मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क