Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › घोडे

निसर्ग

बायबलमध्ये घोडे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 37 उतारे, ओळीनुसार.

  • ईयोब: घोडा खोऱ्यात खूर आपटतो, आपल्या बळात आनंद करतो आणि लढाईत घुसतोईयो 39:19–21
    वचने
    ईयो 39:19–21तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात. तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
  • तो भीतीला हसतो आणि तलवारीपुढून माघार घेत नाहीईयो 39:22–23
    वचने
    ईयो 39:22–23तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही. सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
  • रणशिंग वाजताच तो स्थिर राहू शकत नाही; त्याला लढाईचा वास येतोईयो 39:24–25
    वचने
    ईयो 39:24–25तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही. रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्यास दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात.
  • युद्धाच्या घोड्यांचे फुरफुरणे आणि खिंकाळणे दूरवरून ऐकू येत असेयिर्म 8:16
    वचने
    यिर्म 8:16त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.
  • तोंडातील लगामांमुळे स्वार संपूर्ण जनावराला वळवू शकतातयाको 3:3
    वचने
    याको 3:3पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो.
  • घोडे आणि खेचरे लगाम आणि दावे यांनीच आवरावी लागतातस्तोत्र 32:9
    वचने
    स्तोत्र 32:9म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
  • रथांच्या घोड्यांसाठी जव आणि पेंढा आणला जात असे1 राजे 4:28
    वचने
    1 राजे 4:28रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
  • गाडीची चाके आणि घोडे धान्य न चिरडता त्यावरून फिरवले जातयश 28:28
    वचने
    यश 28:28भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही. आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.

युद्धात

  • फारोचे घोडे आणि रथ यांनी समुद्रापर्यंत इस्राएलाचा पाठलाग केलानिर्ग 14:9, निर्ग 15:19
    वचने
    निर्ग 14:9फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
    निर्ग 15:19फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
  • यहोशवाने शत्रूंच्या घोड्यांच्या नसा तोडल्या आणि त्यांचे रथ जाळलेयहो 11:6, यहो 11:9
    वचने
    यहो 11:6मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
    यहो 11:9परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
  • शंभर सोडून दावीदाने रथांच्या सर्व घोड्यांच्या नसा तोडल्या2 शमु 8:4
    वचने
    2 शमु 8:4सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले.
  • राजा यहोशाफाट अहाबाला: “माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत”1 राजे 22:4
    वचने
    1 राजे 22:4आणि इस्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.”
  • अश्शूरी टोमणा: दोन हजार घोडे, त्यांच्यावर स्वार बसवता आले तर2 राजे 18:23
    वचने
    2 राजे 18:23तर आता अश्शूराचा राजा माझा धनी याच्यावतीने, तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला दोन हजार घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो.
  • शोमरोनातील टेहळ्यांनी अरामी सैन्याच्या मागावर जाण्यासाठी घोडे जुंपलेले दोन रथ घेतले2 राजे 7:13–14
    वचने
    2 राजे 7:13–14यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्या मनुष्यासारखी त्यांची गती होईल.” तेव्हा दोन रथ व घोडे जुंपून त्यांना अरामी सैन्यामागे पाठवले. राजाने त्यांना अरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायला सांगितले.
  • “तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या”यिर्म 46:4
    वचने
    यिर्म 46:4तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.
  • दौडणाऱ्या घोड्यांच्या खुरांचा आवाज आणि रथांचा खडखडाटयिर्म 47:3
    वचने
    यिर्म 47:3त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे, त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट, आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.

राजे आणि व्यापार

  • नियमशास्त्र: राजाने पुष्कळ घोडे जमवू नयेतअनु 17:16
    वचने
    अनु 17:16त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
  • शलमोनाच्या रथांच्या घोड्यांसाठी तबेले, आणि त्याचे घोडेस्वार1 राजे 4:26, 2 इति 9:25
    वचने
    1 राजे 4:26रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते.
    2 इति 9:25घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत:ला लागतील तेवढ्याची यरूशलेमामध्ये केली होती.
  • मिसरातून एक घोडा 150 शेकेल चांदीला, एक रथ 600 ला1 राजे 10:28–29
    वचने
    1 राजे 10:28–29मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत. मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
  • शलमोनाचे घोडे मिसर, क्यू आणि इतर देशांतून येत1 राजे 10:28, 2 इति 9:28
    वचने
    1 राजे 10:28मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत.
    2 इति 9:28मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
  • तोगार्मा सोरेशी घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे यांचा व्यापार करत असेयहे 27:14
    वचने
    यहे 27:14तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.
  • बाबेलहून परत आलेल्यांकडे 736 घोडे आणि 245 खेचरे होतीएज्रा 2:66
    वचने
    एज्रा 2:66त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
  • यहूदातील काही जण मिसराच्या घोड्यांवर आणि रथांवर भरवसा ठेवायला मिसरात गेलेयश 31:1
    वचने
    यश 31:1जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय, आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात. परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही!
  • यहूदाच्या राजांनी सूर्याला वाहिलेले घोडे योशीयाने काढून टाकले2 राजे 23:11
    वचने
    2 राजे 23:11पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ यहूदाच्या राजाने दिले होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
  • मर्दखयाला राजाच्या स्वतःच्या घोड्यावर बसवून नगरातून मिरवलेएस्ते 6:8–11
    वचने
    एस्ते 6:8–11राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा. मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.” मग राजा हामानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे “लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.” मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”
  • अग्नीचा रथ आणि अग्नीचे घोडे यांनी एलीयाला अलीशापासून वेगळे केले2 राजे 2:11
    वचने
    2 राजे 2:11एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.

वचने

  • “त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत”यिर्म 4:13
    वचने
    यिर्म 4:13पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.
  • “त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत”हब 1:8
    वचने
    हब 1:8त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.
  • “लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात”नीति 21:31
    वचने
    नीति 21:31लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.
  • एक स्तोत्र: घोड्याच्या मोठ्या बळानेही तारण होत नाहीस्तोत्र 33:17
    वचने
    स्तोत्र 33:17घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
  • “घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम”नीति 26:3
    वचने
    नीति 26:3घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.
  • “घोडे खडकावरून धावतात का?”आमो 6:12
    वचने
    आमो 6:12घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.
  • “पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील?”यिर्म 12:5
    वचने
    यिर्म 12:5कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील? जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील?

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क