निसर्ग
बायबलमध्ये कसर आणि किडे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 18 उतारे, ओळीनुसार.
कसर
- कसर कपडे खातेयाको 5:2
वचने
याको 5:2तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
- कसर आणि गंज पृथ्वीवरील संपत्तीचा नाश करतातमत्त 6:19–20
वचने
मत्त 6:19–20तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
- स्वर्गातील संपत्ती, जेथे कसर नाश करत नाहीलूक 12:33
वचने
लूक 12:33तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
- “कसरीने खाल्लेल्या कापडासारखा”ईयो 13:28
वचने
ईयो 13:28म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे.”
- “कसर त्यांना खाऊन टाकील” वस्त्राप्रमाणेयश 50:9, यश 51:8
वचने
यश 50:9पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल? पाहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; कसर त्यांना खाऊन टाकील.
यश 51:8कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल, पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.”
- “तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो”ईयो 27:18
वचने
ईयो 27:18तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो, रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते.
- मातीच्या घरांत राहणारे, कसरीसारखे चिरडले जाणारेईयो 4:19
वचने
ईयो 4:19तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे, ज्यांच्या घरांचा पाया धुळीत आहे, ते पंतगासारखे तितक्या लवकर चिरडले जातात?
किडे
- रात्रभर ठेवलेल्या मान्न्यात अळ्या पडल्या आणि त्याला दुर्गंधी येऊ लागलीनिर्ग 16:20
वचने
निर्ग 16:20परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.
- शब्बाथासाठी ठेवलेल्या वाट्यात अळ्या पडल्या नाहीतनिर्ग 16:24
वचने
निर्ग 16:24मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यामध्ये कोठेही किडे पडले नाहीत.
- पहाटे एका किड्याने योनाच्या वेलीला कुरतडले, आणि ती सुकलीयोना 4:7
वचने
योना 4:7मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली.
- हेरोदाला किड्यांनी खाल्ले आणि तो मेलाप्रेषि 12:21–23
वचने
प्रेषि 12:21–23हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला.
- किडे द्राक्षे खातात, म्हणून कोणी ती गोळा करत नाहीअनु 28:39
वचने
अनु 28:39तुम्ही द्राक्षमळा लावून त्यामध्ये खूप श्रम कराल. पण द्राक्षे किंवा द्राक्षरस तुम्हास मिळणार नाही. कारण किड ते खाऊन टाकील.
- ईयोब: “माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे”ईयो 7:5
वचने
ईयो 7:5माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
- कबरेत किडे सुखी आणि दुःखी दोघांनाही झाकतातईयो 21:23–26
वचने
ईयो 21:23–26एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने. त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत. दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते. शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
- “किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल”यश 51:8
वचने
यश 51:8कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्याना खाईल, आणि किड त्यांना लोकरींप्रमाणे खाईल, पण माझा चांगुलपणा सर्वकाळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील.”
- “तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत”यश 14:11
वचने
यश 14:11तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’
- एक स्तोत्र: “मी किटक आहे, मी मनुष्य नाही”स्तोत्र 22:6
वचने
स्तोत्र 22:6परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क