निसर्ग
बायबलमध्ये कमळे आणि गवत
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 35 उतारे, ओळीनुसार.
कमळे
- मंदिराच्या देवडीच्या खांबांचे कळस कमळांच्या आकाराचे होते1 राजे 7:19, 1 राजे 7:22
वचने
1 राजे 7:19जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते.
1 राजे 7:22कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले.
- पितळी गंगाळसागराचा काठ कमळाच्या फुलासारखा होता1 राजे 7:26, 2 इति 4:5
वचने
1 राजे 7:26हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ पाणी मावत असे.
2 इति 4:5या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
- रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा: “ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत”मत्त 6:28, लूक 12:27
वचने
मत्त 6:28आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत,
लूक 12:27रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता.
- शलमोनसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यापैकी एकासारखा सजलेला नव्हतामत्त 6:29
वचने
मत्त 6:29तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता.
- मेंढपाळ कमळांमध्ये आपला कळप चारतोगीत 2:16, गीत 6:3
- कमळे गोळा करायला प्रियकर आपल्या बागेत उतरतोगीत 6:2
वचने
गीत 6:2माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे, बागेत आपला कळप चारायला आणि कमळे वेचण्यास गेला आहे.
- “दरीतले कमलपुष्प” — “जसे काटेरी झाडांत कमलपुष्प”गीत 2:1–2
वचने
गीत 2:1–2मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे. दरीतले कमलपुष्प आहे. जसे काटेरी झाडांत कमलपुष्प, तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
- “त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो”गीत 5:13
वचने
गीत 5:13त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
- कमळांमध्ये चरणारी जुळी पाडसेगीत 4:5
वचने
गीत 4:5हरीणीची जी जुळी, जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
गवत
- गुराढोरांसाठी आणि टेकड्यांवर गवत उगवतेस्तोत्र 104:14, स्तोत्र 147:8, अनु 11:15
वचने
स्तोत्र 104:14तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
स्तोत्र 147:8तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
अनु 11:15माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल.
- कापलेल्या गवतावर पाऊसस्तोत्र 72:6
वचने
स्तोत्र 72:6जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
- धाब्यावरचे गवत वाढण्यापूर्वीच सुकतेस्तोत्र 129:6–7, 2 राजे 19:26
वचने
स्तोत्र 129:6–7ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत. त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
2 राजे 19:26तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
- रानातील गवत: आज आहे, उद्या भट्टीत टाकले जातेमत्त 6:30, लूक 12:28
वचने
मत्त 6:30तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय?
लूक 12:28तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय!
- गवत काढून नेल्यावर नवी पालवी दिसतेनीति 27:25
वचने
नीति 27:25गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.
- कडक उन्हाने रोप सुकते, आणि त्याचे फूल गळतेयाको 1:11
वचने
याको 1:11सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.
- अवर्षणात अहाबाने घोड्यांसाठी गवत मिळावे म्हणून प्रत्येक झरा आणि खोरे शोधले1 राजे 18:5
वचने
1 राजे 18:5अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”
- निम्रीमाचे पाणी आटले आणि गवत सुकलेयश 15:6
वचने
यश 15:6पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
- बेहेमोथ बैलासारखे गवत खातोईयो 40:15
वचने
ईयो 40:15तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.
- नबुखद्नेस्सर बैलासारखे गवत खाऊ लागलादानि 4:33
वचने
दानि 4:33हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
- “वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय?”ईयो 6:5
वचने
ईयो 6:5वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?
- पाच हजार जण हिरव्या गवतावर बसलेयोहा 6:10, मार्क 6:39
वचने
योहा 6:10येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले.
मार्क 6:39येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे.
वचने
- “सर्व देह गवत आहे” … “गवत सुकते आणि फुल कोमेजते”यश 40:6–8, 1 पेत्र 1:24
वचने
यश 40:6–8एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?” सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे. गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे. “गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
1 पेत्र 1:24कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
- नवे गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळपर्यंत सुकतेस्तोत्र 90:5–6
वचने
स्तोत्र 90:5–6पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत. सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
- मनुष्याचे दिवस गवतासारखे आहेत; वारा त्यावरून जातो आणि ते नाहीसे होतेस्तोत्र 103:15–16
वचने
स्तोत्र 103:15–16मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो. वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
- दहिवरासारखे, कोवळ्या गवतावरील मंद पावसासारखे उतरणारे बोलणेअनु 32:2
वचने
अनु 32:2पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव माझे भाषण दहीवराप्रमाणे ठिबको. तो बोध असेल जमिनीवरुन खळखळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर रिझमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क