निसर्ग
बायबलमध्ये कोल्हे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 10 उतारे, ओळीनुसार.
- “खोकडांस बिळे” आहेतमत्त 8:20, लूक 9:58
- शमशोनाने 300 कोल्हे पकडले आणि जोडीजोडीच्या शेपट्यांमध्ये मशाली बांधल्याशास्ते 15:4
वचने
शास्ते 15:4शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
- कोल्ह्यांनी पलिष्ट्यांचे धान्य, द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे जाळलेशास्ते 15:5
वचने
शास्ते 15:5मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
- “आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे”गीत 2:15
वचने
गीत 2:15आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे. कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
- तोबीयाने थट्टा केली: कोल्हा जरी चढला तरी त्यांची भिंत पडेलनहे 4:3
वचने
नहे 4:3तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
- ओसाड सियोन पर्वत, जेथे कोल्हे फिरतातविला 5:18
वचने
विला 5:18सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
- पडलेले कोल्ह्यांचे भक्ष्य होतातस्तोत्र 63:10
वचने
स्तोत्र 63:10त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
वचने
- इस्राएलाचे संदेष्टे “उजाड नापीक भूमीत कोल्ह्यासारखे आहेत”यहे 13:4
वचने
यहे 13:4हे इस्राएला, तुझे भाकीत करणारे उजाड नापीक भूमीत कोल्ह्यासारखे आहेत.
- येशू हेरोदाला “त्या कोल्ह्याला” म्हणतोलूक 13:31–32
वचने
लूक 13:31–32त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क