Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › सकाळचे दव

निसर्ग

बायबलमध्ये सकाळचे दव

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 22 उतारे, ओळीनुसार.

  • रात्री छावणीवर दव पडत असे, आणि त्याबरोबर मान्नागण 11:9
    वचने
    गण 11:9जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.
  • सकाळचे दव उडून गेल्यावर जमिनीवर बारीक पापुद्रे दिसतनिर्ग 16:13–14
    वचने
    निर्ग 16:13–14त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे पक्षी येऊन छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दव पडले. सूर्य उगवल्यावर दव विरून गेले, परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले.
  • रात्रभर फांद्यांवर दव राहतेईयो 29:19
    वचने
    ईयो 29:19मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
  • ढगांतून दव ठिबकत असेनीति 3:20
    वचने
    नीति 3:20त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
  • “पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?”ईयो 38:28
    वचने
    ईयो 38:28पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
  • रात्री प्रियकर: “माझे डोके दहिवराने ओले झाले आहे”गीत 5:2
    वचने
    गीत 5:2मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
  • नबुखद्नेस्सर आकाशातील दवाने भिजत असेदानि 4:33
    वचने
    दानि 4:33हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
  • सियोनाच्या पर्वतांवर पडणारे हर्मोनाचे दवस्तोत्र 133:3
    वचने
    स्तोत्र 133:3सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

कथांमध्ये

  • गिदोनाने लोकरीतून वाटीभर पाणी पिळून काढलेशास्ते 6:37–38
    वचने
    शास्ते 6:37–38तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.” नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले.
  • दुसऱ्या रात्री लोकर कोरडी राहिली आणि जमिनीवर दव पडलेशास्ते 6:39–40
    वचने
    शास्ते 6:39–40मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.” तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.
  • एलीया अहाबाला: या वर्षांत दवही नाही आणि पाऊसही नाही1 राजे 17:1
    वचने
    1 राजे 17:1गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
  • दावीदाचा विलाप: “गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो!”2 शमु 1:21
    वचने
    2 शमु 1:21गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
  • हाग्गय: आकाशाने आपले दव आणि भूमीने आपले पीक रोखून धरलेहाग्ग 1:10
    वचने
    हाग्ग 1:10यास्तव तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे.”

आशीर्वाद

  • इसहाकाचा आशीर्वाद: आकाशातील दव आणि भूमीची समृद्धीउत्प 27:28
    वचने
    उत्प 27:28देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल.
  • एसाव आकाशातील दवापासून दूर राहीलउत्प 27:39
    वचने
    उत्प 27:39मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.
  • मोशे: योसेफाचा देश आकाशातील मौल्यवान दवाने आशीर्वादितअनु 33:13
    वचने
    अनु 33:13योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
  • धान्य आणि नवा द्राक्षारस यांचा देश, जेथे आकाशातून दव ठिबकतेअनु 33:28
    वचने
    अनु 33:28म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.

वचने

  • “उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे”होशे 6:4, होशे 13:3
    वचने
    होशे 6:4एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
    होशे 13:3म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
  • राजाचा “उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे”नीति 19:12
    वचने
    नीति 19:12राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
  • “जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू”2 शमु 17:12
    वचने
    2 शमु 17:12दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या मनुष्यांसहीत आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही.
  • “कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र” येते तसेयश 18:4
    वचने
    यश 18:4परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क