शोधा › विषय › हरिणे आणि सांबरे
निसर्ग
बायबलमध्ये हरिणे आणि सांबरे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 19 उतारे, ओळीनुसार.
- शुद्ध आणि अशुद्ध दोघेही हरिणे आणि सांबरे खाऊ शकतातअनु 12:15, अनु 14:5
वचने
अनु 12:15तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.
अनु 14:5सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे.
- शलमोनाच्या मेजासाठी हरिणे, सांबरे आणि भेकरे पुरवली जात1 राजे 4:22–23
वचने
1 राजे 4:22–23शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
- ईयोब: हरिणी आपल्या पाडसाला जन्म देण्यासाठी वाकते; पिले मोकळ्या रानात वाढतातईयो 39:1–4
वचने
ईयो 39:1–4रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का? ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
- अवर्षणात गवत नसल्यामुळे हरिणी आपल्या नवजात पाडसाला सोडून देतेयिर्म 14:5
वचने
यिर्म 14:5कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.
- “जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते”स्तोत्र 42:1
वचने
स्तोत्र 42:1मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मासकील. (शिक्षण) जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.
- कुरण न मिळालेल्या हरिणांना शिकाऱ्यापासून पळण्याचे बळ उरत नाहीविला 1:6
वचने
विला 1:6सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे. तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले आहेत, आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत.
- सांबर शिकाऱ्याच्या हातून स्वतःला सोडवतेनीति 6:5
वचने
नीति 6:5शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव.
वचने
- असाएल रानातील सांबरासारखा वेगाने धावणारा होता2 शमु 2:18
वचने
2 शमु 2:18यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.
- गादी योद्धे पर्वतांवरील हरिणांसारखे चपळ होते1 इति 12:8
वचने
1 इति 12:8गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
- उंच स्थानांवर “देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो”2 शमु 22:34, स्तोत्र 18:33, हब 3:19
वचने
2 शमु 22:34देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
स्तोत्र 18:33तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!
हब 3:19प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)
- “सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी”नीति 5:19
वचने
नीति 5:19कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
- प्रियकर, पर्वतांवरील सांबरासारखा किंवा तरुण हरिणासारखागीत 2:9, गीत 2:17, गीत 8:14
वचने
गीत 2:9माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
गीत 2:17शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फीर.
गीत 8:14माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.
- “वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते”गीत 2:7
वचने
गीत 2:7यरूशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की, आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
- “नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे”उत्प 49:21
वचने
उत्प 49:21नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे. त्याचे बोलणे गोड असेल.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क