निसर्ग
बायबलमध्ये साप
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 28 उतारे, ओळीनुसार.
- उत्पत्ती: रानातील कोणत्याही पशूपेक्षा सर्प धूर्त होताउत्प 3:1
वचने
उत्प 3:1परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?”
- उत्पत्ती: सर्पाने पोटावर सरपटावे आणि धूळ खावीउत्प 3:14
वचने
उत्प 3:14परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.
- “दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग” — अति आश्चर्यकारक चार गोष्टींपैकी एकनीति 30:18–19
वचने
नीति 30:18–19मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,
- भिंतींतील साप: भिंत फोडणाऱ्याला किंवा तिच्यावर टेकणाऱ्याला तो चावू शकतोउप 10:8, आमो 5:19
- गारुडी: मंत्र म्हणण्यापूर्वीच साप चावला तर काहीच फायदा नाहीउप 10:11
वचने
उप 10:11जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही.
- गारुड्याच्या सुराला कान बंद करणारा नागस्तोत्र 58:4–5
वचने
स्तोत्र 58:4–5त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
- मंत्राने वश न होणारे फुरसेयिर्म 8:17
वचने
यिर्म 8:17कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो.
- रस्त्याजवळचा फुरसा घोड्याच्या टाचांना चावतो, आणि स्वार मागे कोसळतोउत्प 49:17
वचने
उत्प 49:17तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल. तो घोड्याच्या टाचेला दंश करील. त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.
- रानात विषारी साप आणि विंचू होतेअनु 8:15
वचने
अनु 8:15विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
- नेगेब: सिंह, फुरसा आणि उडणारा सर्प यांचा प्रदेशयश 30:6
वचने
यश 30:6नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
- फुरशाचे अंडे फोडले, तर फुरसा बाहेर येतोयश 59:5
वचने
यश 59:5ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.
कथांमध्ये
- मोशेच्या काठीचा साप झाला; तो त्यापासून पळाला, मग त्याने त्याची शेपटी धरलीनिर्ग 4:3–4
वचने
निर्ग 4:3–4मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला.
- अहरोनाच्या काठीचा सर्प झाला आणि त्याने जादूगारांच्या काठ्या गिळल्यानिर्ग 7:10–12
वचने
निर्ग 7:10–12तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला. त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
- रानात विषारी सापांनी इस्राएलांना दंश केला, आणि पुष्कळ जण मेलेगण 21:6
वचने
गण 21:6तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांस चावले आणि बरेच इस्राएल लोक मरण पावले.
- मोशेने खांबावर पितळी साप केला; दंश झालेल्यांनी त्याकडे पाहिले आणि ते जगलेगण 21:8–9
वचने
गण 21:8–9परमेश्वर मोशेला म्हणाला, एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो मनुष्य मरणार नाही. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
- लोक त्याला धूप जाळत म्हणून हिज्कीयाने तो पितळी साप, नहुश्तान, फोडून टाकला2 राजे 18:4
वचने
2 राजे 18:4त्याने उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली. तसेच स्मृतीस्तंभ, आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले कारण त्या दिवसांमध्ये इस्राएलाचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास “नहुश्तान” असे म्हणत.
- मिलिता बेटावर आगीच्या उष्णतेने बाहेर पडलेला फुरसा पौलाच्या हाताला डसलाप्रेषि 28:3–4
वचने
प्रेषि 28:3–4पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.”
- पौलाने तो झटकून टाकला; तो सुजेल म्हणून बेटावरचे लोक वाट पाहत राहिलेप्रेषि 28:5–6
वचने
प्रेषि 28:5–6परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.
- येशू आपल्या शिष्यांना साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार देतोलूक 10:17, लूक 10:19
वचने
- “तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा”मत्त 10:16
वचने
मत्त 10:16लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
- मुलाने मासा मागितला तर कोणता बाप त्याला साप देईल?मत्त 7:10, लूक 11:11
- द्राक्षारस: “तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो”नीति 23:31–32
वचने
नीति 23:31–32जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको. पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
- “त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते”स्तोत्र 140:3
वचने
स्तोत्र 140:3त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
- “ते सापाप्रमाणे धुळ चाटतील”मीखा 7:17
वचने
मीखा 7:17ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.
- “मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे”यिर्म 46:22
वचने
यिर्म 46:22मिसर फूत्कारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्याविरोधात सैन्यासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुऱ्हाडीसह तिच्याकडे जात आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क