निसर्ग
बायबलमध्ये शेरडे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 34 उतारे, ओळीनुसार.
- इस्राएलाला खाता येतील अशा प्राण्यांपैकी शेरडे आहेतअनु 14:4
वचने
अनु 14:4खाण्यास पात्र असे पशू हे, गाय बैल, शेळ्या, मेंढ्या,
- रिबकेने दोन करडांचे इसहाकाच्या आवडीचे पक्वान्न केलेउत्प 27:9
वचने
उत्प 27:9आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,
- एसावासारखे वाटावे म्हणून याकोबाच्या हातांवर आणि मानेवर करडांची कातडीउत्प 27:16
वचने
उत्प 27:16तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले.
- योसेफाच्या भावांनी त्याचा झगा करडाच्या रक्तात बुडवलाउत्प 37:31
वचने
उत्प 37:31त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला.
- यहूदाने मोबदला म्हणून आपल्या कळपातील एक करडू देण्याचे वचन दिलेउत्प 38:17, उत्प 38:20
वचने
उत्प 38:17यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?”
उत्प 38:20यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही.
- याकोबाने एसावाला दिलेल्या भेटीत 200 शेळ्या आणि 20 बोकड होतेउत्प 32:14
वचने
उत्प 32:14त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
- गिदोनाने एक करडू तयार केले: मांस टोपलीत, रस्सा भांड्यातशास्ते 6:19
वचने
शास्ते 6:19गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले.
- मानोहाने एका खडकावर करडू अर्पण केलेशास्ते 13:19
वचने
शास्ते 13:19मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
- इशायाने दावीदाच्या हाती शौलाला भाकर, द्राक्षारसाचा बुधला आणि करडू पाठवले1 शमु 16:20
वचने
1 शमु 16:20तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
- कर्मेलाच्या नाबालाकडे हजार शेरडे होती1 शमु 25:2
वचने
1 शमु 25:2मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
- थोरला भाऊ: “तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही”लूक 15:29
वचने
लूक 15:29परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही.
- घरच्यांना पोसण्यासाठी शेळ्यांचे भरपूर दूधनीति 27:27
वचने
नीति 27:27बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.
- बकरे शेताचे मोल मिळवून देतातनीति 27:26
वचने
नीति 27:26वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.
बकऱ्याचे केस
- बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांनी निवासमंडपावरील तंबू केलानिर्ग 26:7, निर्ग 36:14
वचने
निर्ग 26:7त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.
निर्ग 36:14नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
- कुशल स्त्रियांनी बकऱ्याचे केस कातलेनिर्ग 35:26
वचने
निर्ग 35:26आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.
- मीखलने दावीदाच्या पलंगावर ठेवलेल्या मूर्तीवर बकऱ्याचे केस घातले1 शमु 19:13
वचने
1 शमु 19:13मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.
- मिद्यानाशी झालेल्या लढाईनंतर बकऱ्याच्या केसांची प्रत्येक वस्तू शुद्ध केलीगण 31:20
वचने
गण 31:20तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”
नियमशास्त्रात
- वल्हांडणाचे कोकरू मेंढरांतून किंवा शेरडांतून घेता येईनिर्ग 12:5
वचने
निर्ग 12:5तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा.
- योशीयाने वल्हांडणासाठी 30,000 कोकरे आणि करडे दिली2 इति 35:7
वचने
2 इति 35:7वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
- नवजात करडू सात दिवस आपल्या आईजवळ राहतेलेवी 22:27
वचने
लेवी 22:27वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
- “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये”निर्ग 23:19
वचने
निर्ग 23:19आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
- प्रायश्चित्ताचा दिवस: दोन बकऱ्यांवर चिठ्ठ्या; एक रानात सोडला जातोलेवी 16:8–10, लेवी 16:21–22
वचने
लेवी 16:8–10अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा; पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
लेवी 16:21–22अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
रानबकरे
- “रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात”स्तोत्र 104:18
वचने
स्तोत्र 104:18रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
- शौलाने रानबकऱ्याच्या खडकांजवळ दावीदाचा शोध घेतला1 शमु 24:2
वचने
1 शमु 24:2तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
- “रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का?”ईयो 39:1
वचने
ईयो 39:1रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
- रानबकरा आणि रानशेळी खाता येतातअनु 14:5
वचने
अनु 14:5सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे.
वचने
- केस “गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे”गीत 4:1, गीत 6:5
वचने
गीत 4:1अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
गीत 6:5तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत.
- ऐटीत चालणाऱ्यांपैकी एक: बोकडनीति 30:29–31
वचने
नीति 30:29–31जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही. गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा.
- “ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो”मत्त 25:32
वचने
मत्त 25:32मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.
- करडू फाडावे तसे शमशोनाने सिंहाला फाडलेशास्ते 14:6
वचने
शास्ते 14:6तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क