Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › मेंढरे

निसर्ग

बायबलमध्ये मेंढरे

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 38 उतारे, ओळीनुसार.

  • हाबेल मेंढरे पाळणारा होताउत्प 4:2
    वचने
    उत्प 4:2त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला.
  • हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेले आणलेउत्प 4:4
    वचने
    उत्प 4:4हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले.
  • शिंगे झुडपात अडकलेला एक एडका अब्राहामाला दिसलाउत्प 22:13
    वचने
    उत्प 22:13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले.
  • कळपांना पाणी पाजण्यासाठी मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरची धोंड लोटतउत्प 29:2–3
    वचने
    उत्प 29:2–3त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता. जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.
  • राहेल मेंढपाळीण होती; याकोबाने तिच्या वडिलांच्या मेंढरांना पाणी पाजलेउत्प 29:9–10
    वचने
    उत्प 29:9–10याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती. जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.
  • इथ्रोच्या सात मुलींनी कळपाला पाणी पाजले, आणि मोशेने त्यांना मदत केलीनिर्ग 2:16–17
    वचने
    निर्ग 2:16–17मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या; परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले.
  • होरेबास आला तेव्हा मोशे इथ्रोचा कळप राखत होतानिर्ग 3:1
    वचने
    निर्ग 3:1तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
  • सर्वांत धाकटा मुलगा दावीद मेंढरे राखायला बाहेर गेलेला होता1 शमु 16:11
    वचने
    1 शमु 16:11तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”
  • मेंढपाळ याकोब: दिवसा ऊन, रात्री दहिवर, वन्य पशूंमुळे नुकसानउत्प 31:38–40
    वचने
    उत्प 31:38–40मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.
  • याकोबाची मजुरी: ठिपकेदार, कबरी आणि काळसर जनावरेउत्प 30:32
    वचने
    उत्प 30:32परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
  • पाणी पिण्याच्या कुंडांजवळ त्याच्या सोललेल्या फांद्या आणि बांडी पिलेउत्प 30:37–39
    वचने
    उत्प 30:37–39मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या. त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत. तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली.
  • मेंढपाळ रात्री आपल्या कळपांवर पहारा करत होतेलूक 2:8
    वचने
    लूक 2:8त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते.
  • मेंढरे मेंढपाळाचा आवाज ओळखतात; तो त्यांना नावाने हाक मारतोयोहा 10:3–4
    वचने
    योहा 10:3–4त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो; आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.

लोकर, दूध आणि लोकर कातरणे

  • कळपाचे दूध, कोकरांची चरबी आणि बाशानाचे एडकेअनु 32:14
    वचने
    अनु 32:14गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यालात.
  • राहेलने मूर्ती घेतल्या तेव्हा लाबान आपली मेंढरे कातरायला गेलेला होताउत्प 31:19
    वचने
    उत्प 31:19त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
  • यहूदा तिम्ना येथे आपल्या लोकर कातरणाऱ्यांकडे गेलाउत्प 38:12–13
    वचने
    उत्प 38:12–13बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला. तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”
  • नाबालाकडे 3,000 मेंढरे आणि 1,000 शेरडे होती, त्यांची लोकर तो कर्मेल येथे कातरत असे1 शमु 25:2
    वचने
    1 शमु 25:2मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.
  • लोकर कातरण्याचा काळ म्हणजे मेजवानी: नाबालाची आणि अबशालोमाची1 शमु 25:11, 1 शमु 25:36, 2 शमु 13:23–24
    वचने
    1 शमु 25:11माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?”
    1 शमु 25:36मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.
    2 शमु 13:23–24दोन वर्षानंतर मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले. अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा.
  • कळपाची पहिली कातरलेली लोकर याजकांना मिळत असेअनु 18:3–4
    वचने
    अनु 18:3–4यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. धान्य, नवीन द्राक्षरस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
  • ईयोबाने आपल्या मेंढरांच्या लोकरीने गरिबांना ऊब दिलीईयो 31:20
    वचने
    ईयो 31:20त्यांनी मला अंत:करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही.

संख्येतील कळप

  • मवाबाचा राजा मेशा 100,000 कोकरे आणि 100,000 एडक्यांची लोकर देत असे2 राजे 3:4
    वचने
    2 राजे 3:4आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे.
  • अरबांनी यहोशाफाटाला 7,700 एडके आणि 7,700 बोकड आणले2 इति 17:11
    वचने
    2 इति 17:11कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
  • हगारी लोकांकडून 250,000 मेंढरे घेतली1 इति 5:21
    वचने
    1 इति 5:21त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
  • ईयोबाकडे 7,000 मेंढरे होती, आणि नंतर 14,000ईयो 1:3, ईयो 42:12
    वचने
    ईयो 1:3ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता.
    ईयो 42:12परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत.
  • केदार सोरेशी कोकरे, एडके आणि बोकड यांचा व्यापार करत असेयहे 27:21
    वचने
    यहे 27:21अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.
  • मंदिराच्या समर्पणाच्या वेळी शलमोनाने 120,000 मेंढरे अर्पण केली1 राजे 8:63
    वचने
    1 राजे 8:63शलमोनाने बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे बली अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वरास अर्पण केले.

नियमशास्त्रात

  • चोरलेले मेंढरू कापले किंवा विकले: चार मेंढरे परत द्यानिर्ग 22:1
    वचने
    निर्ग 22:1एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
  • वन्य पशूंनी फाडलेले मेंढरू: पुरावा म्हणून त्याचे मढे आणानिर्ग 22:10, निर्ग 22:13
    वचने
    निर्ग 22:10एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;
    निर्ग 22:13जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.

यरूशलेमेत

  • याजकांनी मेंढेवेस पुन्हा बांधलीनहे 3:1
    वचने
    नहे 3:1मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
  • बेथेसदा तळे मेंढेवेशीजवळ होतेयोहा 5:2
    वचने
    योहा 5:2यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.

वचने

  • दात “लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत” त्यांच्या कळपासारखेगीत 4:2
    वचने
    गीत 4:2लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
  • “त्यांची स्थिती जाणून खात्री कर” — आपल्या कळपांचीनीति 27:23
    वचने
    नीति 27:23तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.
  • “वस्त्रासाठी कोकरे आहेत”नीति 27:26
    वचने
    नीति 27:26वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.
  • जशी “मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते”यश 53:7
    वचने
    यश 53:7त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क