निसर्ग
बायबलमध्ये कावळे
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 9 उतारे, ओळीनुसार.
- इस्राएलाने खाऊ नयेत अशा पक्ष्यांपैकी कावळे आहेतलेवी 11:15, अनु 14:14
- नोहाने एक कावळा बाहेर सोडला; पाणी सुकेपर्यंत तो इकडे-तिकडे उडत राहिलाउत्प 8:7
वचने
उत्प 8:7त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.
- करीथ ओढ्याजवळ कावळे सकाळ-संध्याकाळ एलीयासाठी भाकर आणि मांस आणत1 राजे 17:4–6
वचने
1 राजे 17:4–6त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
- कावळ्यांची पिले अन्नासाठी ओरडतातईयो 38:41, स्तोत्र 147:9
वचने
ईयो 38:41कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?
स्तोत्र 147:9तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
- कावळे पेरत नाहीत की कापणी करत नाहीत, त्यांना भांडार किंवा कोठार नसतेलूक 12:24
वचने
लूक 12:24कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!
वचने
- “केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत”गीत 5:11
वचने
गीत 5:11त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
- एक म्हण: थट्टा करणारा डोळा खोऱ्यातील कावळे फोडून काढतातनीति 30:17
वचने
नीति 30:17जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क