दैनंदिन जीवन
बायबलमध्ये आळस
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 26 उतारे, ओळीनुसार.
नीतिसूत्रांतील वचने
- अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे जा: ती उन्हाळ्यात अन्न साठवतेनीति 6:6–8
वचने
नीति 6:6–8अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही. तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.
- थोडीशी झोप, आणि दारिद्र्य लुटारूसारखे येतेनीति 6:9–11
वचने
नीति 6:9–11अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
- आळशाचे शेत: काटे, कुसळे आणि पडलेली दगडी भिंतनीति 24:30–34
वचने
नीति 24:30–34मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती. मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.
- आळशी हात मनुष्याला दरिद्री करतातनीति 10:4
वचने
नीति 10:4आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो.
- कापणीच्या वेळी झोपणारा मुलगा लाज आणणारा असतोनीति 10:5
वचने
नीति 10:5उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.
- दातांना शिरका आणि डोळ्यांना धूर तसा तोनीति 10:26
वचने
नीति 10:26जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
- आळसाचा शेवट वेठबिगारीत होतोनीति 12:24
वचने
नीति 12:24उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
- आळशी मनुष्य आपली शिकारही भाजत नाहीनीति 12:27
वचने
नीति 12:27आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
- आळशाला हाव असते, तरी त्याला काही मिळत नाहीनीति 13:4, नीति 21:25
वचने
नीति 13:4आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
नीति 21:25आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
- आळशाचा मार्ग काटेरी कुंपणासारखा असतोनीति 15:19
वचने
नीति 15:19आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
- कामात ढिला असलेला नाश करणाऱ्याचा भाऊ असतोनीति 18:9
वचने
नीति 18:9जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
- तो ताटात हात घालतो, पण तो तोंडापर्यंत उचलत नाहीनीति 19:24, नीति 26:15
वचने
नीति 19:24आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
नीति 26:15आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.
- तो योग्य वेळी नांगरत नाही आणि कापणीला त्याला काहीच मिळत नाहीनीति 20:4
वचने
नीति 20:4आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
- “बाहेर रस्त्यावर सिंह आहे!”नीति 22:13, नीति 26:13
वचने
नीति 22:13आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
नीति 26:13आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे.
- दार बिजागरीवर फिरते, तसा आळशी आपल्या अंथरूणावरनीति 26:14
वचने
नीति 26:14दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.
- विवेकाने उत्तर देणाऱ्या सात जणांपेक्षा तो स्वतःच्या दृष्टीने शहाणानीति 26:16
वचने
नीति 26:16विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
इतरत्र
- आळसाने छप्पर कोसळते आणि घर गळतेउप 10:18
वचने
उप 10:18जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
- मूर्ख हाताची घडी घालतोउप 4:5
वचने
उप 4:5मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे.
- आपली थैली पुरणाऱ्या दासाला आळशी म्हटले जातेमत्त 25:26
वचने
मत्त 25:26मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.
- तुमचा आवेश कमी होऊ देऊ नकारोम 12:11
वचने
रोम 12:11कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा.
- “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये”2 थेस्स 3:10–12
वचने
2 थेस्स 3:10–12कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो. अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
- तरुण विधवा घरोघरी फिरत आळशी व्हायला शिकतात1 तीम 5:13
वचने
1 तीम 5:13आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
- आळशी होऊ नकाइब्री 6:12
वचने
इब्री 6:12आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क