दैनंदिन जीवन
बायबलमध्ये चुंबने
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 32 उतारे, ओळीनुसार.
भेट आणि निरोप
- याकोब विहिरीजवळ राहेलचे चुंबन घेतो आणि मोठ्याने रडतोउत्प 29:11
वचने
उत्प 29:11याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला.
- लाबान आपल्या नातवंडांचे आणि मुलींचे चुंबन घेऊन निरोप देतोउत्प 31:55
वचने
उत्प 31:55दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.
- एसाव याकोबाकडे धावत जातो, त्याला मिठी मारतो आणि त्याचे चुंबन घेतोउत्प 33:4
वचने
उत्प 33:4एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
- योसेफ रडत रडत आपल्या प्रत्येक भावाचे चुंबन घेतोउत्प 45:15
वचने
उत्प 45:15मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
- अहरोन देवाच्या डोंगरावर मोशेला भेटतो आणि त्याचे चुंबन घेतोनिर्ग 4:27
वचने
निर्ग 4:27मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
- मोशे आपल्या सासऱ्याला नमन करून त्याचे चुंबन घेतोनिर्ग 18:7
वचने
निर्ग 18:7तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.
- नामी आपल्या सुनांचे चुंबन घेते; अर्पा तिचे चुंबन घेऊन निरोप घेतेरूथ 1:9, रूथ 1:14
- दावीद आणि योनाथान एकमेकांचे चुंबन घेऊन एकत्र रडतात1 शमु 20:41
वचने
1 शमु 20:41पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.
- दावीद यार्देनेजवळ बर्जिल्ल्याचे चुंबन घेतो2 शमु 19:39
वचने
2 शमु 19:39राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
- अलीशा आपल्या आईवडिलांचे चुंबन घेऊन निरोप घेण्याची परवानगी मागतो1 राजे 19:20
वचने
1 राजे 19:20अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्यास म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे.” मग मी तुझ्याबरोबर येतो. एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव.”
- पिता परत येणाऱ्या मुलाकडे धावत जातो आणि त्याचे चुंबन घेतोलूक 15:20
वचने
लूक 15:20मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले.
- इफिसातील वडील पौलाला मिठी मारून त्याचे चुंबन घेतातप्रेषि 20:37
वचने
प्रेषि 20:37तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.
कुटुंब आणि जिव्हाळा
- इसहाक: “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे”उत्प 27:26–27
वचने
उत्प 27:26–27मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.” मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. आणि त्याने त्याच्या कपड्यांचा वास घेतला; त्याने त्यास आशीर्वाद दिला. तो म्हणाला, “पाहा ज्या शेताला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचा वास जसा येतो तसा माझ्या मुलाचा वास आहे.
- जवळजवळ आंधळा झालेला म्हातारा याकोब योसेफाच्या मुलांचे चुंबन घेतोउत्प 48:10
वचने
उत्प 48:10इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
- योसेफ आपल्या मृत वडिलांवर रडतो आणि त्यांचे चुंबन घेतोउत्प 50:1
वचने
उत्प 50:1त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली.
- शमुवेल शौलाला अभिषेक करतो आणि त्याचे चुंबन घेतो1 शमु 10:1
वचने
1 शमु 10:1तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही?
- परत आल्यावर राजा दावीद अबशालोमाचे चुंबन घेतो2 शमु 14:33
वचने
2 शमु 14:33तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.”
- “तू माझे मुखचुंबन घे”गीत 1:2
वचने
गीत 1:2तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
- प्रामाणिक उत्तर ओठांवरच्या चुंबनासारखे असतेनीति 24:26
वचने
नीति 24:26जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
फसवी चुंबने
- शत्रूची चुंबने कपटी असतातनीति 27:6
वचने
नीति 27:6मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.
- अबशालोम लोकांचे चुंबन घेऊन त्यांना वश करतो2 शमु 15:5
वचने
2 शमु 15:5अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी त्याचे चुंबन घेई.
- यवाब चुंबन घेण्यासाठी अमासाची दाढी धरतो आणि त्याला भोसकतो2 शमु 20:9–10
वचने
2 शमु 20:9–10त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले. यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
- यहूदा: “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे”मत्त 26:48–49, लूक 22:48
वचने
मत्त 26:48–49आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा, मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
लूक 22:48परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”
उपासना आणि सुरुवातीची मंडळी
- मूर्तींचे चुंबन: बआल आणि वासरे1 राजे 19:18, होशे 13:2
वचने
1 राजे 19:18एलीया, इस्राएलमध्ये बआलापुढे कधी वाकले नाहीत असे सात हजार लोक अजूनही आहेत. यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बालमूर्तीचे चुंबन घेतलेले नाही.”
होशे 13:2आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
- एक स्त्री येशूच्या पायांचे चुंबन घेते; त्याच्या यजमानाने चुंबन दिले नव्हतेलूक 7:38, लूक 7:45
- पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करारोम 16:16, 1 थेस्स 5:26, 1 पेत्र 5:14
वचने
रोम 16:16पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.
1 थेस्स 5:26सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
1 पेत्र 5:14प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क