दैनंदिन जीवन
बायबलमध्ये शिकार आणि पाश
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 14 उतारे, ओळीनुसार.
- निम्रोद, “परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी”उत्प 10:9
वचने
उत्प 10:9तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
- इश्माएल रानात वाढतो आणि मोठा धनुर्धारी होतोउत्प 21:20
वचने
उत्प 21:20देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
- एसाव कुशल शिकारी, रानात फिरणारा मनुष्य होतोउत्प 25:27
वचने
उत्प 25:27ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.
- इसहाकाला शिकारीच्या मांसाची आवड आहे आणि तो एसावावर प्रीती करतोउत्प 25:28
वचने
उत्प 25:28एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
- इसहाक एसावाला भाता व धनुष्य घेऊन शिकारीला पाठवतोउत्प 27:3–5
वचने
उत्प 27:3–5म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये. मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.
- एसाव शिकारीहून परत येतो, पण आशीर्वादासाठी फार उशीर झालेला असतोउत्प 27:30–33
वचने
उत्प 27:30–33इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला. त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.” इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.” मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”
नियमशास्त्रात
- शिकार केलेल्या जनावराचे रक्त वाहू देऊन मातीने झाकले जातेलेवी 17:13
वचने
लेवी 17:13इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
फासे आणि जाळी
- जाळे, जाळी, सापळा, पाश आणि जमिनीत लपवलेला फासईयो 18:8–10
वचने
ईयो 18:8–10त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे. सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल. जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
- जाळ्यात सापडलेले हरीणयश 51:20
वचने
यश 51:20तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय. परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत.
- पारधी दबा धरून बसतात आणि सापळे लावतातयिर्म 5:26
वचने
यिर्म 5:26कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.
- वाटेवर पसरलेल्या जाळ्याच्या दोऱ्या आणि लावलेली आमिषेस्तोत्र 140:5
वचने
स्तोत्र 140:5गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
तुलना
- दावीद: जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा1 शमु 26:20
वचने
1 शमु 26:20तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
- “पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे”विला 3:52
वचने
विला 3:52निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.
- “पारध्याच्या पाशातून” सुटकास्तोत्र 91:3
वचने
स्तोत्र 91:3कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क