Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › झोप

दैनंदिन जीवन

बायबलमध्ये झोप

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 34 उतारे, ओळीनुसार.

वचने

  • तो आपल्या प्रियांना झोप देतोस्तोत्र 127:2
    वचने
    स्तोत्र 127:2तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
  • “मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो”स्तोत्र 4:8, स्तोत्र 3:5
    वचने
    स्तोत्र 4:8मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
    स्तोत्र 3:5मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
  • तू विसावा घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईलनीति 3:24
    वचने
    नीति 3:24तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
  • कष्टकऱ्याची झोप गोड असते; श्रीमंताची विपुलता त्याला झोपू देत नाहीउप 5:12
    वचने
    उप 5:12काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते, तो थोडे खावो किंवा अधिक खावो, पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही.
  • झोपेची आवड धरू नका, नाहीतर तुम्ही दरिद्री व्हालनीति 20:13
    वचने
    नीति 20:13झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
  • “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो”नीति 6:9–10, नीति 24:33
    वचने
    नीति 6:9–10अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.”
    नीति 24:33“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
  • आळसाने गाढ झोप येतेनीति 19:15
    वचने
    नीति 19:15आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
  • इस्राएलाचा रक्षक डुलकी घेत नाही आणि झोपत नाहीस्तोत्र 121:4
    वचने
    स्तोत्र 121:4पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
  • एलीया बआलाच्या संदेष्ट्यांची थट्टा करतो: कदाचित तो झोपला असेल1 राजे 18:27
    वचने
    1 राजे 18:27दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.”
  • एक नवस: परमेश्वरासाठी निवासस्थान मिळेपर्यंत झोप नाहीस्तोत्र 132:3–5
    वचने
    स्तोत्र 132:3–5तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही. मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”

उदाहरणे

  • आदाम गाढ झोपेत पडतोउत्प 2:21
    वचने
    उत्प 2:21तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली.
  • सूर्य मावळत असताना अब्राम गाढ झोपेत पडतोउत्प 15:12
    वचने
    उत्प 15:12नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.
  • याकोब डोक्याखाली दगड घेऊन झोपतोउत्प 28:11
    वचने
    उत्प 28:11तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला.
  • याकोब: रात्री दहिवर, आणि माझ्या डोळ्यांची झोप उडालीउत्प 31:40
    वचने
    उत्प 31:40दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.
  • थकून झोपलेल्या सीसराला याएल ठार मारतेशास्ते 4:21
    वचने
    शास्ते 4:21मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली, तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.
  • दलीला शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवतेशास्ते 16:19
    वचने
    शास्ते 16:19मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
  • बवाज धान्याच्या राशीजवळ झोपतो; मध्यरात्री त्याला रूथ आढळतेरूथ 3:7–8
    वचने
    रूथ 3:7–8खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गुपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपली. मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले.
  • दावीद झोपलेल्या शौलाजवळचा भाला आणि पाण्याची सुरई घेतो1 शमु 26:7, 1 शमु 26:12
    वचने
    1 शमु 26:7मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
    1 शमु 26:12तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
  • दुपारी विश्रांती घेत असताना ईश-बोशेथला मारले जाते2 शमु 4:5
    वचने
    2 शमु 4:5बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.
  • एलीयाला रतमाच्या झाडाखाली झोप लागते1 राजे 19:5
    वचने
    1 राजे 19:5एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, “उठ हे खा.”
  • झोप न येणारा अहश्वेरोश राजइतिहास वाचून दाखवायला लावतोएस्ते 6:1
    वचने
    एस्ते 6:1त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.
  • नबुखद्नेस्सराची स्वप्ने: त्याची झोप उडालीदानि 2:1
    वचने
    दानि 2:1नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही.
  • दानीएल सिंहांबरोबर असताना दारयावेशाला झोप लागत नाहीदानि 6:18
    वचने
    दानि 6:18नंतर राजा त्याच्या महलात गेला. ती रात्र तो न जेवता असाच राहिला, त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली.
  • वादळात योना जहाजाच्या तळभागात झोपतोयोना 1:5
    वचने
    योना 1:5तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.
  • वादळात येशू नावेच्या वरामावर उशीवर झोपतोमत्त 8:24, मार्क 4:38, लूक 8:23
    वचने
    मत्त 8:24तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता.
    मार्क 4:38परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”
    लूक 8:23नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले.
  • गेथशेमाने येथे शिष्यांना झोप लागतेमत्त 26:40–43, लूक 22:45
    वचने
    मत्त 26:40–43मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.” नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते.
    लूक 22:45आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले.
  • पेत्र तुरुंगात दोन शिपायांच्या मध्ये झोपतोप्रेषि 12:6
    वचने
    प्रेषि 12:6पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.
  • पौल बोलत असताना युतुखला डुलकी लागते आणि तो खिडकीतून पडतोप्रेषि 20:9
    वचने
    प्रेषि 20:9युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क