Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › राग

दैनंदिन जीवन

बायबलमध्ये राग

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 41 उतारे, ओळीनुसार.

वचने

  • मृदू उत्तराने क्रोध शांत होतो; कठोर शब्दाने राग भडकतोनीति 15:1
    वचने
    नीति 15:1शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
  • मंदक्रोधी मनुष्य योद्ध्यापेक्षा श्रेष्ठनीति 16:32, नीति 14:29
    वचने
    नीति 16:32ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
    नीति 14:29सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
  • संयम नसलेला मनुष्य भिंती पडलेल्या नगरासारखा असतोनीति 25:28
    वचने
    नीति 25:28जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल, तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.
  • मूर्ख आपला सगळा राग ओकतो; शहाणा तो आवरून धरतोनीति 29:11
    वचने
    नीति 29:11मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो.
  • दूध घुसळल्याने लोणी निघते, तसा राग चेतवल्याने कलह होतोनीति 30:33
    वचने
    नीति 30:33कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.
  • राग मूर्खाच्या उरात वसतोउप 7:9
    वचने
    उप 7:9तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
  • रागापासून दूर राहा; त्यातून केवळ हानीच होतेस्तोत्र 37:8
    वचने
    स्तोत्र 37:8रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
  • सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू देऊ नकाइफि 4:26
    वचने
    इफि 4:26तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.
  • ऐकायला तत्पर, बोलायला धीमा, रागावायला धीमायाको 1:19–20
    वचने
    याको 1:19–20माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.

उदाहरणे

  • काइन अतिशय रागावतो आणि आपला भाऊ हाबेल याला मारतोउत्प 4:5–8
    वचने
    उत्प 4:5–8परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.” काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.
  • याकोब राहेलला: “त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”उत्प 30:2
    वचने
    उत्प 30:2याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”
  • संतापलेला याकोब लाबानाला जाब विचारतोउत्प 31:36
    वचने
    उत्प 31:36मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात?
  • याकोब: शिमोन आणि लेवी यांनी रागाच्या भरात माणसे मारलीउत्प 49:5–7
    वचने
    उत्प 49:5–7“शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे. माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात. तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन, ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
  • पत्नीची गोष्ट ऐकून योसेफाचा मालक रागाने पेटतोउत्प 39:19
    वचने
    उत्प 39:19आणि असे झाले की, त्याच्या धन्याने पत्नीचे बोलणे ऐकले, ती त्यास म्हणाली की, “तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले,” तो खूप संतापला.
  • फारो मोशेला: “आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस!”निर्ग 10:28
    वचने
    निर्ग 10:28मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
  • रागाने संतप्त होऊन मोशे फारोपुढून निघून जातोनिर्ग 11:8
    वचने
    निर्ग 11:8मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
  • वासरू पाहताच मोशे पाट्या फोडून टाकतोनिर्ग 32:19
    वचने
    निर्ग 32:19मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
  • मोशे खडकावर दोनदा काठी मारतोगण 20:10–11
    वचने
    गण 20:10–11मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
  • बलाम आपल्या गाढवीला मारतो, आणि ती बोलू लागतेगण 22:27–29
    वचने
    गण 22:27–29गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या काठीने मारायला सुरुवात केली. नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस. बलामने गाढवीला उत्तर दिले, तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.
  • बालाक बलामावर रागावून हातावर हात आपटतोगण 24:10
    वचने
    गण 24:10बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
  • गिदोन मृदू उत्तराने एफ्राईमाच्या संतप्त माणसांना शांत करतोशास्ते 8:1–3
    वचने
    शास्ते 8:1–3तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
  • अलीयाबाचा राग आपला धाकटा भाऊ दावीद याच्यावर भडकतो1 शमु 17:28
    वचने
    1 शमु 17:28त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
  • शौल आपला मुलगा योनाथान याच्यावर भाला फेकतो1 शमु 20:30–34
    वचने
    1 शमु 20:30–34तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय? कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्यास माझ्याकडे आण, कारण त्यास खचित मरण पावले पाहिजे.” मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?” तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे. मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.
  • नाथानाची श्रीमंत माणसाची गोष्ट ऐकून दावीद रागाने पेटतो2 शमु 12:5
    वचने
    2 शमु 12:5दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे
  • खिन्न आणि रागावलेला अहाब जेवायला नकार देतो1 राजे 21:4
    वचने
    1 राजे 21:4तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हास देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले.
  • नामान: दिमिष्काच्या नद्या यार्देनेपेक्षा चांगल्या नाहीत काय?2 राजे 5:11–12
    वचने
    2 राजे 5:11–12नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील. अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यामध्येच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
  • आसा द्रष्ट्याला तुरुंगात टाकतो2 इति 16:10
    वचने
    2 इति 16:10द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
  • हातात धूपपात्र घेतलेला उज्जीया याजकांवर संतापतो2 इति 26:19
    वचने
    2 इति 26:19पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
  • राणी वश्ती येण्यास नकार देते तेव्हा अहश्वेरोश संतापतोएस्ते 1:12
    वचने
    एस्ते 1:12पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला; त्याचा क्रोधाग्नी भडकला.
  • मर्दखय नमन करत नाही तेव्हा हामान क्रोधाने भरतोएस्ते 3:5
    वचने
    एस्ते 3:5जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
  • अलीहू ईयोबावर आणि त्याच्या तीन मित्रांवर रागाने पेटतोईयो 32:2–3
    वचने
    ईयो 32:2–3नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला. अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते.
  • नबुखद्नेस्सर भट्टी सातपट अधिक तापवतोदानि 3:13, दानि 3:19
    वचने
    दानि 3:13तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.
    दानि 3:19नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी.
  • सुकलेल्या वेलीविषयी योना: “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल”योना 4:1, योना 4:9
    वचने
    योना 4:1परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला.
    योना 4:9मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”
  • ज्ञानी लोकांनी फसवल्यामुळे हेरोद संतापाने भरतोमत्त 2:16
    वचने
    मत्त 2:16तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले.
  • नासरेथच्या सभास्थानातील लोक येशूला कड्यावरून लोटून द्यायला पाहतातलूक 4:28–29
    वचने
    लूक 4:28–29हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले. ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
  • त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे येशू सर्वांकडे रागाने पाहतोमार्क 3:5
    वचने
    मार्क 3:5मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
  • संतापलेली न्यायसभा स्तेफनावर दातओठ खातेप्रेषि 7:54–58
    वचने
    प्रेषि 7:54–58त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली.
  • पौल महायाजकाला: “हे चुना लावलेल्या भिंती”प्रेषि 23:3
    वचने
    प्रेषि 23:3तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क