दैनंदिन जीवन
बायबलमध्ये मेज आणि भोजन
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 36 उतारे, ओळीनुसार.
मेज
- अलीशाच्या लहान खोलीत पलंग, मेज, खुर्ची आणि दिवा2 राजे 4:10
वचने
2 राजे 4:10तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यामध्ये एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल.”
- अदोनी-बेजेकच्या मेजाखाली सत्तर राजे उष्टे वेचतशास्ते 1:7
वचने
शास्ते 1:7तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे.” त्यांनी त्यास यरूशलेमेस आणले; तेथे तो मेला.
- निवासमंडपाचे मेज: बाभळीचे लाकूड, सोन्याने मढवलेले, वाहण्यासाठी दांड्यांसहनिर्ग 25:23–28
वचने
निर्ग 25:23–28बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी. ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा. मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा. मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात. या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे. मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
- दर शब्बाथ दिवशी सोन्याच्या मेजावर दोन रांगांत बारा भाकरी ठेवल्या जातलेवी 24:5–8
वचने
लेवी 24:5–8तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
- मंदिरासाठी सोन्याची आणि चांदीची मेजे1 इति 28:16
वचने
1 इति 28:16आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
- येशू सराफांचे चौरंग उलथून टाकतोयोहा 2:15
वचने
योहा 2:15तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.
- मेजाखालची कुत्री मुलांच्या ताटातले कण खातातमत्त 15:27, मार्क 7:28
वचने
मत्त 15:27ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”
मार्क 7:28परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
- लाजराला श्रीमंत माणसाच्या मेजावरून पडणाऱ्या कणांची आस लागते (दाखला)लूक 16:21
वचने
लूक 16:21त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
- तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखीस्तोत्र 128:3
वचने
स्तोत्र 128:3तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
बसणे आणि टेकून बसणे
- पाहुणे झाडाखाली जेवत असताना अब्राहाम त्यांच्याजवळ उभा राहतोउत्प 18:8
वचने
उत्प 18:8त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.
- जेवणाच्या वेळी रूथ कापणी करणाऱ्यांच्या शेजारी बसतेरूथ 2:14
वचने
रूथ 2:14भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
- राणी एस्तेर जिच्यावर टेकून बसली होती त्या बिछान्यावर हामान पडतोएस्ते 7:8
वचने
एस्ते 7:8मग जेथे द्राक्षरस दिला गेला होता त्या दालनामध्ये, राजा बागेतून येऊन उभा राहिला मेजवानीच्या, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.
- येशू बारा जणांबरोबर जेवायला टेकून बसतोमत्त 26:20
वचने
मत्त 26:20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला.
- येशूच्या कुशीत टेकून बसलेला शिष्य मागे झुकून त्याला विचारतोयोहा 13:23–25
वचने
योहा 13:23–25तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
- एक परूशी येशूला जेवायला बोलावतो, आणि तो जेवायला बसतोलूक 7:36
वचने
लूक 7:36तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला.
- मार्था वाढते, आणि लाजर येशूबरोबर जेवायला बसतोयोहा 12:2
वचने
योहा 12:2म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता.
- पाच हजार जण शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नासांच्या गटांनी गवतावर बसतातमार्क 6:39–40, लूक 9:14
वचने
मार्क 6:39–40येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.
लूक 9:14कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,”
कोण कोणाबरोबर जेवले
- दावीद शौलाच्या मेजावर येत नाही; योनाथान रागाने मेजावरून उठतो1 शमु 20:29, 1 शमु 20:34
वचने
1 शमु 20:29तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.”
1 शमु 20:34मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.
- शलमोनाच्या मेजावर येणाऱ्या सर्वांसाठी अधिकारी अन्न पुरवतात1 राजे 4:27
वचने
1 राजे 4:27शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
- शलमोनाचे मेज आणि त्याच्या सेवकांची बैठक पाहून शबाची राणी थक्क होते1 राजे 10:4–5
वचने
1 राजे 10:4–5शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली.
- पाहुण्यांखेरीज पुष्कळ यहूदी आणि अधिकारी नहेम्याच्या मेजावर जेवतातनहे 5:17
वचने
नहे 5:17माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत.
- यहोयाखीन आयुष्यभर बाबेलच्या राजाच्या मेजावर जेवतो2 राजे 25:29
वचने
2 राजे 25:29अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
- मत्तयाच्या घरी येशू जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवतोमत्त 9:10–11, मार्क 2:15–16, लूक 15:2
वचने
मत्त 9:10–11येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?”
मार्क 2:15–16नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते. तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”
लूक 15:2तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!”
- “माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे”लूक 22:21
वचने
लूक 22:21परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.
- पुनरुत्थित येशू: “या, न्याहरी करा”योहा 21:12
वचने
योहा 21:12येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
- पहिले विश्वासणारे घरोघरी भाकर मोडतातप्रेषि 2:46
वचने
प्रेषि 2:46ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
- वाढप्याचे काम करण्यासाठी सुवार्ता सांगण्याकडे दुर्लक्ष करणे बारा जणांना नको आहेप्रेषि 6:2
वचने
प्रेषि 6:2तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
- सुंता न झालेल्या माणसांबरोबर जेवल्याबद्दल पेत्रावर टीका होतेप्रेषि 11:3
वचने
प्रेषि 11:3ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.”
- अंत्युखियात पेत्र परराष्ट्रीयांबरोबर जेवण्यापासून माघार घेतोगल 2:12
वचने
गल 2:12कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.
- तुरुंगाधिकारी पौल आणि सीला यांच्यापुढे जेवण वाढतोप्रेषि 16:34
वचने
प्रेषि 16:34मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंदोत्सव केला.
- अविश्वासणाऱ्याने बोलावले? पुढे ठेवलेले जे असेल ते खा1 करिं 10:27
वचने
1 करिं 10:27विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क