दैनंदिन जीवन
बायबलमध्ये आजार आणि वैद्य
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 41 उतारे, ओळीनुसार.
वैद्य
- योसेफाचे वैद्य याकोबाच्या शरीरात सुगंधी द्रव्ये भरतातउत्प 50:2
वचने
उत्प 50:2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले.
- पायांच्या दुखण्याने बेजार झालेला आसा वैद्यांचा आश्रय घेतो2 इति 16:12, 1 राजे 15:23
वचने
2 इति 16:12आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
1 राजे 15:23आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
- बारा वर्षे रक्तस्राव होणाऱ्या स्त्रीने आपले सर्वस्व वैद्यांवर खर्च केलेमार्क 5:25–26, लूक 8:43
वचने
मार्क 5:25–26आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते.
लूक 8:43आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना,
- “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे”मत्त 9:12
वचने
मत्त 9:12येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
- एक म्हण: “हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर”लूक 4:23
वचने
लूक 4:23येशू त्यांना म्हणाला, “नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.” मग तो पुढे म्हणाला,
- लूक, “प्रिय वैद्य”कल 4:14
वचने
कल 4:14प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात.
- “गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय?”यिर्म 8:22
वचने
यिर्म 8:22गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.
उपाय
- हिज्कीयाच्या गळवावर अंजिरांचे पोटीस2 राजे 20:7, यश 38:21
वचने
2 राजे 20:7मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
यश 38:21आता यशया म्हणतो, अंजीराची एक चांदकी आणून गळवावर बांधा आणि त्यास बरे वाटेल.
- शोमरोनी तेल आणि द्राक्षारस ओतून जखमांना पट्टी बांधतोलूक 10:34
वचने
लूक 10:34तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली.
- पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या दुखण्यांसाठी थोडासा द्राक्षारस1 तीम 5:23
वचने
1 तीम 5:23ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
- आजाऱ्यांना तेलाने अभिषेक केला जाईमार्क 6:13, याको 5:14
वचने
मार्क 6:13त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले.
याको 5:14तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
- आनंदी मन उत्तम औषध आहेनीति 17:22
वचने
नीति 17:22आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो.
उदाहरणे
- याकोब आजारी पडतो; योसेफ आपल्या दोन मुलांना घेऊन येतोउत्प 48:1
वचने
उत्प 48:1या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.
- आजारी पडल्यावर मिसरी दासाला त्याचा मालक सोडून देतो1 शमु 30:13
वचने
1 शमु 30:13तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.
- यराबामाचा मुलगा आजारी पडतो; त्याची आई वेष बदलून संदेष्ट्याकडे जाते1 राजे 14:1–3
वचने
1 राजे 14:1–3याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला. तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
- सारफथ येथील विधवेचा मुलगा आजारी पडतो1 राजे 17:17
वचने
1 राजे 17:17काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते, त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला.
- शेतात शूनेमकरीण स्त्रीचा मुलगा: “माझे डोके, माझे डोके”2 राजे 4:18–20
वचने
2 राजे 4:18–20मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला. तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.
- जाळीतून पडून अहज्या जखमी होतो2 राजे 1:2
वचने
2 राजे 1:2नंतर अहज्या आपल्या शोमरोनमधल्या त्याच्या माडीवरच्या खिडकीच्या जाळीतून खाली पडला व जखमी झाला. तेव्हा अहज्याने आपल्या सेवकांना बोलावले आणि त्यांना सांगितले. “जा, आणि एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारून या, मी या दुखण्यातून बरा होईन का.”
- अरामाचा बेन-हदाद आपण बरे होऊ की नाही हे अलीशाला विचारतो2 राजे 8:7–8
वचने
2 राजे 8:7–8अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्यास सांगितले, “आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे.” तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग.”
- ज्या आजाराने अलीशा मरण पावला त्या आजाराने तो आजारी पडतो2 राजे 13:14
वचने
2 राजे 13:14आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
- हिज्कीया मरणाच्या पंथाला लागतो, मग बरा होतोयश 38:1, 2 राजे 20:7
वचने
यश 38:1त्या दिवसात, हिज्कीया आजारी पडून मरणाच्या टोकास आला होता, आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, तुझ्या घराची व्यवस्था कर; कारण तू मरणार आहेस तू जगणार नाहीस.”
2 राजे 20:7मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
- गळवांनी भरलेला ईयोब खापरीने अंग खाजवतोईयो 2:7–8
वचने
ईयो 2:7–8मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले. ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला.
- दृष्टान्तानंतर दानीएल कित्येक दिवस आजारी पडून राहतोदानि 8:27
वचने
दानि 8:27तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्यास समजणारा कोणीच नव्हता.
- पेत्राची सासू कडक तापाने अंथरूणाला खिळलेली असतेमत्त 8:14, लूक 4:38
- कफर्णहूम येथे एका राजाच्या अधिकाऱ्याचा मुलगा आजारी पडलेला असतोयोहा 4:46–47
वचने
योहा 4:46–47नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता.
- फेफरे येणारा मुलगा वारंवार आगीत किंवा पाण्यात पडतोमत्त 17:15
वचने
मत्त 17:15“प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.
- बेथेसदाच्या तळ्याजवळ पुष्कळ आजारी पडून असतात; एक मनुष्य अडतीस वर्षेयोहा 5:2–3, योहा 5:5
वचने
योहा 5:2–3यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे.
योहा 5:5तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता.
- जन्मापासून लंगडा असलेल्या माणसाला रोज मंदिराच्या दाराशी उचलून आणले जातेप्रेषि 3:2
वचने
प्रेषि 3:2आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
- बेथानीचा लाजर आजारी आहे; त्याच्या बहिणी येशूला निरोप पाठवतातयोहा 11:1–3
वचने
योहा 11:1–3आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. तिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती हीच मरीया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता. म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, “प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.”
- दुर्कस आजारी पडते आणि मरण पावतेप्रेषि 9:37
वचने
प्रेषि 9:37जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.
- पुब्ल्याचे वडील ताप आणि आमांश यांनी आजारी आहेतप्रेषि 28:8
वचने
प्रेषि 28:8पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले.
- एपफ्रदीत आजारी पडतो, जवळजवळ मरणाच्या दारीफिलि 2:25–27
वचने
फिलि 2:25–27तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले. कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता; तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.
- एका आजारपणामुळे पौल पहिल्यांदा गलतीयात सुवार्ता सांगतोगल 4:13–14
वचने
गल 4:13–14प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे. आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला.
- पौल त्रफिमाला मिलेता शहरात आजारी सोडतो2 तीम 4:20
वचने
2 तीम 4:20एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क